ठाणे : बदलापूरमधील एका शाळेत अत्याचार झालेल्या दोन चिमुकल्यांच्या प्रकृतीची चुकीची माहिती समाजमाध्यांवर प्रसारित करून अफवा पसरविण्यात येत असून या पार्श्वभूमीवर बदलापुर रेल्वे स्थानकात झालेले आंदोलन लक्षात घेऊन ठाणे पोलिसांनी मध्य रेल्वेच्या ठाणे ते बदलापुरपर्यंतच्या सर्वच स्थानक परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच चिमुकल्यांच्या प्रकृतीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि असे चुकीचे संदेश प्रसारित करून त्यांच्या कुटूंबियांचे मानसिक खच्चीकरण करू नका, असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे.

बदलापुरातील आदर्श शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर देशभरात संताप व्यक्त होत आहे. मंगळवारी शहरात मोठा जनक्षोभ उसळल्यानंतर बुधवारी शहरात तणावपूर्ण शांतता होती. अफवा आणि नागरिकांमध्ये पुन्हा चुकीची माहिती प्रसारित होऊ नये म्हणून राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या आदेशानंतर २० ऑगस्टपासून बुधवारी मध्यरात्रीपर्यंत बदलापूर शहरातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. परंतु यानंतरही समाजमाध्यांवर चुकीचे संदेश प्रसारित करून अफवा पसरविण्यात येत आहे. अनेक नागरिकांच्या व्हाट्सअप स्टेटस वर चुकीची माहिती देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचे चुकीचे संदेश ठेवण्यात आले होते. या संदेशांमुळे शहरात पुन्हा एकदा अफवांचा बाजार तेजित असतानाच, चिमुकल्यांच्या कुटुंबीयांबद्दल आणि सायंकाळनंतर चक्क चिमुकल्यांच्या प्रकृतीबाबत चुकीची माहिती प्रसारित करण्यात आली. मात्र या सर्व अफवा होत्या, अशी माहिती कुटुंबीयांच्या सहकाऱ्यांनी कळवले. तरीही अनेक नागरिक कोणत्याही पडताळणीविनाच हा संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित करीत आहेत. या पार्श्वभूमीवर बदलापुर रेल्वे स्थानकात झालेले आंदोलन लक्षात घेऊन ठाणे पोलिसांनी मध्य रेल्वेच्या ठाणे ते बदलापुरपर्यंतच्या सर्वच स्थानक परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. यामध्ये स्थानिक पोलिस, शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथकांचा समावेश आहे.

Rashmi Joshi, cancer, support, Rashmi Joshi news,
रश्मी जोशी… कॅन्सरग्रस्तांसाठी आधारवड!
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
BJP Navi Mumbai, Navi Mumbai Eknath Shinde,
नवी मुंबईत शिंदे समर्थकांच्या अभियानामुळे भाजपमध्ये अस्वस्थता
sonam wangchuk s indefinite hunger strike
सोनम वांगचुक यांचे बेमुदत उपोषण
Encroachment of vendors on footpaths of Rana Pratap Nagar nagpur
नागपूर:राणा प्रतापनगरचे पदपथ विक्रेत्यांच्या ताब्यात
In Badlapur case accused Akshay Shinde Thane alleged encounter
चकमकी अखेर पोलिसांवरच का शेकतात?
Thousands protested in Gondia on September 22 against attacks on women in Bangladesh
गोंदिया : हातात फलक, डोळ्यात राग; बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ जनआक्रोश…
pune Kalyani group marathi news
मुखत्यारनाम्यासंबंधी आरोप निराधार; कल्याणी समूहाचे स्पष्टीकरण, कायदेशीर मार्गाने उत्तर देण्याचेही प्रतिपादन

हे ही वाचा… Bombay High Court on Badlapur Case: “४ वर्षांच्या मुलींनाही सोडलं जात नाहीये, ही काय स्थिती आहे?” उच्च न्यायालयाने बदलापूर पोलिसांना फटकारलं; तपासावर ताशेरे!

हे ही वाचा… Badlapur sexual assault : “बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या घरावर जमावाचा हल्ला, तोडफोड आणि..”, शेजाऱ्यांनी काय सांगितलं?

बदलापूरातील त्या दोन्ही चिमुकल्यांची प्रकृती व्यवस्थित असून कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. अशा चुकीच्या संदेशामुळे त्या चिमुकल्यांच्या कुटूंबियांचे खच्चीकरण होत आहे. त्यामुळे असे चुकीचे संदेश कुणीही प्रसारित करून अ‌फवा पसरवू नये. तसेच बदलापूरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदाराची उपाय म्हणून ठाणे ते बदलापूरपर्यंतच्या सर्वच रेल्वे स्थानकांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये स्थानिक पोलिस, शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथकांचा समावेश आहे. – डाॅ. ज्ञानेश्वर चव्हाण, सह पोलिस आयुक्त, ठाणे शहर