डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचापाडा भागातील भोईर जीमखाना, विजय सोसायटी मैदान परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांचे रुंदीकरण, काँक्रीटीकरण कामासाठी गेल्या वर्षी या रस्त्यावरील अतिक्रमणे पालिकेने काढून टाकली. वर्ष होत आले तरी या वर्दळीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम पालिकेकडून हाती घेण्यात येत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

पालिकेच्या ह प्रभाग कार्यालयाजवळ हा दुरावस्था झालेला रस्ते परिसर आहे. महात्मा फुले रस्ता काँक्रीटीकरणाचे काम माजी नगरसेवक जितेंद्र भोईर यांच्या बंगल्यापर्यंत आणून ठेवण्यात आले आहे. याठिकाणी अर्धा रस्ता काँक्रीटचा, उर्वरित रस्ता डांबराचा असल्याने या भागात खड्डा झाला आहे. वाहन चालकांना या ठिकाणाहून वाहने नेताना कसरत करावी लागते.

PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
Pune pubs
पुण्यात आता मध्यरात्री दीडपर्यंत ‘चिअर्स’… पब, मद्यालयांबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

फुले रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम गेल्या आठ महिन्यापासून काम सुरू होते. गरीबाचापाडा, विजयनगर सोसायटी, मैदान परिसर, भोईर जीमखाना परिसर, सुभाष रस्ता पोहच रस्त्यांचे काँक्रीटीकरण आणि रुंदीकरणाचे काम सुरू होईल असे रहिवाशांना वाटले होते. या रस्त्यांच्या कामासाठी या भागातील इमारतीच्या संरक्षक भिंती तोडून टाकल्या. टपऱ्या हटविण्यात आल्या होत्या. रस्ते काम होत नसल्याने रस्त्यावरील वाहनांचा धुरळा घरात येतो. आरोग्याचे त्रास सुरू होतात, असे रहिवाशांनी सांगितले.

भोईर जिमखाना येथील व्यायाम शाळेत, ज्ञानेश्वर विद्यालयात दररोज परिसरातून मुले शिक्षण, व्यायासाठी येतात. त्यांनाही या खाचखळग्याच्या रस्त्यावरुन येजा करावी लागते. अवजड ट्रक विजय सोसायटी मैदान रस्त्यावर आला तर दोन्ही बाजुची वाहतूक बंद होते. रस्ते कामे होत नसल्याने भूमाफियांनी फुले रस्ता ते सुभाष रस्ता दरम्यानच्या अंतर्गत भागातील चाळी तोडून तेथे बेकायदा इमले बांधण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या ह प्रभाग कार्यालया पासून हाकेच्या अंतरावर ही बेकायदा बांधकामे सुरू असुनही त्यांच्यावर प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही. ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांना या बेकायदा बांधकामांची माहिती होती. त्यांनीही या बांधकामांकडे दुर्लक्ष केले असल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारी प्रशासनाकडे पोहचल्यामुळे रोकडे यांची ह प्रभागातून उचलबांगडी करण्यात आली.

बेकायदा इमारती बांधताना भूमाफिया इमारतीला सामासिक अंतर ठेवत नाहीत. त्यामुळे अधिकृत इमारतीला खेटून बेकायदा इमारत उभारली जाते. लगतच्या सोसायटीतील घरात काळोख पसरतो. या बांधकामाची तक्रार केली तर माफियांकडून त्रास होईल म्हणून कोणी बोलण्यास तयार नाही, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. पालिकेत लोकप्रतिनिधी राजवट नाही. प्रशासनातील अधिकारी म्हणणे ऐकून घेण्यास तयार नाही. रस्ते कामाच्या तक्रारी कोणाकडे करायच्या, असा प्रश्न गरीबाचापाडा भागातील रहिवाशांनी केला आहे.

येत्या महिनाभरात विजय सोसायटी मैदान, भोईर जिमखाना परिसरातील रस्ते कामे पालिकेने सुरू केली नाहीत तर स्थानिक रहिवाशांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

“ महात्मा फुले रस्त्यावरील विजय सोसायटी मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. त्यावेळी या भागातील अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण केली जाणार आहेत.रोहिणी लोकरे- कार्यकारी अभियंता डोंबिवली