लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : बाळकुम येथे काही महिन्यांपूर्वी इस्कॉन मंदिर उभारण्यात आले आहे. कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने या मंदिरात ५० हजाराहून अधिक भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील बाळकुम, कापूरबावडी, कोलशेत, ढोकाळी भागात मोठ्या कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाहतुक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी रविवारी आणि सोमवारी या दोन दिवसांसाठी वाहतुक बदल लागू केले आहेत.

Three youths drowned Sangli, Durga idol, Sangli,
सांगली : दुर्गामूर्ती विसर्जन करताना तीन तरुण बुडाले, दोघांना वाचवले, एक बेपत्ता, शोध मोहीम सुरु
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
16 kg gold saree, Mahalakshmi Devi Pune,
पुणे : श्री महालक्ष्मी देवीला १६ किलो सोन्याची साडी परिधान
Leopard Nate area, Ratnagiri, Leopard, loksatta news,
रत्नागिरी : नाटे परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याची दहशत, विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात वन विभागाला यश
Chaitanya Parva of Navratri begins in Kolhapur
कोल्हापुरात नवरात्रीच्या चैतन्यपर्वास प्रारंभ
pune traffic route changes
Navratri 2024: पुण्यात नवरात्रोत्सवानिमित्त प्रमुख मंदिरांच्या परिसरात वाहतूक बदल
Shahala masks, Uran, Navratri festival, loksatta news,
नवरात्रोत्सवात उरणमध्ये शहाळ्याच्या मुखवट्यांची परंपरा
gold price hike in during Navratri festival
ऐन नवरात्राच्या तोंडावर सोन्याच्या दरात बदल… आता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्रॅम…

बाळकुम येथील पिरॅमल वैकुंठ परिसरात इस्कॉन मंदिर आहे. या मंदिरात दररोज नागरिक दर्शनासाठी जात असतात. सोमवारी कृष्ण जन्माष्टमी आहे. त्यामुळे इस्कॉन मंदिरामध्ये जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. ठाणे जिल्ह्यासह विविध भागातून रविवारी (आज) पासून सोमवारी भाविक या मंदिरारामध्ये दर्शनासाठी येण्याची शक्यता मंदिर प्रशासनाने व्यक्त केली आहे. बाळकुम, कोलशेत, ढोकाळी भागात गेल्याकाही वर्षांमध्ये मोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत. त्यामुळे येथे नागरी वस्ती देखील वाढली आहे.

आणखी वाचा-कृष्ण अष्टमीच्या दिवशी डोंबिवलीतील वर्दळीचे रस्ते वाहतुकीसाठी बंद

तसेच याच भागात ठाणे महापालिकेचे सेंट्रल पार्क हे उद्यान आहे. या उद्यानात देखील नागरिक येत असतात. असे असले तरी येथील रस्ते अद्यापही अरुंद आहेत. त्यामुळे वाहन चालकांना कोंडीचा सामना सहन करावा लागतो. इस्कॉन मंदिरातील कार्यक्रमांमुळे भाविकांची वाहने आल्यास त्याचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर होऊन कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाहतुक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी या भागात वाहतुक बदल लागू केले आहेत. रविवारी (आज) सकाळी ७ वाजल्यापासून सोमवारी रात्री ११ वाजेपर्यंत हे वाहतुक बदल लागू असणार आहे.

असे आहेत वाहतुक बदल

  • कोलशेत रोड येथील कल्पतरू पार्क जवळील राम मारूती रोड मार्गे बाळकूमच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना या मार्गावर प्रवेशबंदी असेल. येथील वाहने ढोकाळी नाका मार्गे वाहतुक करतील.
  • पिरॅमल वैकुंठ, बाळकुम प्रवेशद्वार क्रमांक एक समोरील राम मारूती रोड मार्गे कोलशेतच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना दादलानी चौकात प्रवेशबंदी असेल. येथील वाहने दोस्ती वेस्ट कौन्टी प्रवेशद्वारजवळून वळण घेऊन वाहतुक करतील.
  • कोलशेत गाव येथील जलवाहिनी मार्गे तसेच दोस्ती वेस्ट कौन्टी प्रवेशद्वार येथून सेवा रस्ता मार्गे बाळकुमच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना दोस्ती वेस्ट कौन्टी प्रवेशद्वार येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने कोलशेत रोड, लोढा अमारा मार्गे वाहतुक करतील.
  • यशस्वी नगर, हायलँड चौकातुन जलवाहिनी मार्गे पिरॅमल वैकुंठ येथून बाळकुम, कोलशेतच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना राधाकृष्ण स्वीट समोरील चौकात प्रवेशबंदी असेल. येथील वाहने यशस्वीनगर मार्गे वाहतुक करतील.
  • साकेत, बाळकुमनाका येथून राम मारूती रोड मार्गे कोलशेतच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या सर्व वाहनांना बाळकुम नाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने माजिवडा- मानपाडा प्रभाग समिती, हायलँड रोड मार्गे वाहतुक करतील.
  • भिवंडी, दादलानी येथून राम मारूती रोड मार्गे कोलशेतच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना दादलानी चौकात प्रवेशबंदी असेल. येथील वाहने बाळकुम नाका मार्गे वाहतुक करतील.
  • दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना हायलँड येथील मैदानात त्यांची वाहने उभी करता येणार आहेत.