scorecardresearch

देखभाल- दुरुस्तीसाठी कल्याण पश्चिमेच्या काही भागात गुरुवारी वीज बंद

वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित व पावसाळापूर्व देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी कल्याण पश्चिम विभागातील काही भागाचा वीजपुरवठा गुरुवारी (१२ मे) काही काळ बंद ठेवण्यात येणार आहे.

कल्याण:वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित व पावसाळापूर्व देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी कल्याण पश्चिम विभागातील काही भागाचा वीजपुरवठा गुरुवारी (१२ मे) काही काळ बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
२२ केव्ही दुर्गाडी उपकेंद्रातून निघणाऱ्या आधारवाडी फिडरवरील सोनावणे कॉलेज, वाडेकर सर्कल, साईबाबा मंदिर, अन्नपुर्णा नगर, जेलरोड, सहजानंद चौक फिडरवरील मोहिंदरसिंग काबुलसिंग, ठाणकरपाडा, दुर्गानगर, मानससरोवर, सुंदरनगर, महाराष्ट्र नगर, आग्रा रोड फिडरवरील आग्रा रोड, भारताचार्य चौक, लाल चौकी, पारनाका, नमस्कार मंडळ, बंदर रोड फिडरवरील रेतीबंदर, मिठबंदर, व्हाईट हाऊस, मौलवी कंपाऊंड, गोविंदवाडी, कोलीवाडा आदी भागाचा वीजपुरवठा गुरुवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
संबंधित भागाचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात इतर वाहिन्यांवरून सुरू ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. वाडेघर फिडरवरील आनंदसागर, डीबी चौक, श्री कॉम्लेक्स मेहरनगर, डॉन बॉस्को शाळा, वाडेघर, साई शरण आदी भागाचा वीजपुरवठा सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Power outages some parts kalyan west maintenance power distribution system durgadi sub center before monsoon amy

ताज्या बातम्या