ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची भरवस्तीत त्यांच्याच कार्यालयात गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्रास्त्राने वार करुन हत्या करण्यात आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप उसळला आहे. या घटनेतील आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पोस्ट टॅग करत शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. शिवसैनिकाच्या हत्येचा हिशेब होत असतो. याला इतिहास साक्षी आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचाही होणार.. या घटनेला हलक्यात कोणीही घेऊ नये! असा इशाराही त्यांनी दिला.
प्रदिप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन हत्येप्रकरणातील एका आरोपीसोबत राजेंद्र शिंदे हे उभे असल्याचे छायाचित्रही यावेळी दाखवले. आरोपी, राजेंद्र शिंदे आणि अन्य व्यक्ती चर्चा करताना आपण पाहिले असल्याचा दावा करत शिंदे दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करून अटकेची मागणी त्यांनी केली. तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्ती, कॉल डेटा रेकॉर्ड आणि अन्य पुरावे तपासावेत, अशी मागणीही त्यांनी केली. निवडणुकीच्या काळात मीनाक्षी शिंदे यांनी धमकावल्याचा आरोपही त्यांनी केला. पूर्णेकर आणि मीनाक्षी शिंदे यांच्यात समाजमाध्यमांवरून वाद होत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, दरम्यान, मिनाक्षी शिंदे यांनी मात्र आरोप फेटाळून लावत चुकीचे आरोप केले जात असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या हत्येनंतर आता ठाकरे गटाकडून शिंदे गटावर टीका होऊ लागली आहे. अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फेसबुक पोस्ट टॅग करत गंभीर आरोप केले आहेत.
काय म्हणाले दानवे
हत्या वाईटच. पण ती लोकाभिमुख कार्य करणाऱ्या शिवसैनिकाची असेल तर अधिक क्लेशदायक. ‘कानून के हात लंबे होते है’ हा आता मात्र डायलॉग राहिला आहे, Devendra Fadnavis & Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे. शिवसैनिकाच्या हत्येचा हिशेब होत असतो. याला इतिहास साक्षी आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचाही होणार.. या घटनेला हलक्यात कोणीही घेऊ नये! लढवैय्या शिवसैनिकाला भावपूर्ण श्रद्धांजली असे पहिल्या पोस्टमध्ये म्हणाले.
https://www.facebook.com/share/p/1SUie1u9e3/दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मीनाक्षी शिंदे उभ्या असल्याचे छायाचित्र पोस्ट केले. त्यामध्ये शिवसेना पक्षाचे पूर्णेकर ह्यांचा खून झाला. त्यांच्या कुटुंबियांनी शिंदे गटाच्या मीनाक्षी शिंदे ह्यांचे नाव थेट घेतले आहे. मात्र पोलिस प्रशासन ह्या मीनाक्षी ला साध्या चौकशी साठी बोलावत नाहीत ! सामान्य प्रकरणात असा संशय व्यक्त केला की ताब्यात घेतात. इथे का नाही ?
सत्ता, पैशासाठी खून करताय तुमचे लोक’ असे म्हणत हीपोस्ट शिंदे यांना टॅक गेली आहे.
