जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बुधवारी सकाळी बारामती तालुक्यात येत असताना विमान कोसळून झालेल्या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या निधनाने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान मैदानात अजितदादांच्या पार्थिवावर आज सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशाचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासह देशातील आणि राज्यातील अनेक दिग्गज नेते अजित पवारांच्या अंत्यविधीला उपस्थित होते. यानंतर शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी समाजमाध्यमांवर अजित पवार यांना उद्देशून एक पत्र लिहून भावना व्यक्त केल्या आहेत.

शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते. प्रताप सरनाईक यांची राजकीय कारकीर्द ही राष्ट्रवादी काँग्रेस येथूनच झाली. यामुळे प्रताप सरनाईक आणि अजित पवार यांचे जुने संबंध. याच दरम्यान प्रताप सरनाईक यांनी अजित पवार यांना रत्नजडित असा मोबाईल भेट म्हणून दिला होता. मात्र अजित पवारांनी हा मोबाईल स्वीकारून मुंबईतील सिद्धिविनायक देवस्थान येथे दान स्वरूपात दिला. या भेटवस्तू प्रकरणाची चांगलीच चर्चा झाली होती. याच आठवणींना मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्र लिहून उजाळा देत, अजित पवारांविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.

प्रताप सरनाईक काय म्हणाले ?

प्रिय अजितदादा,

आज हे पत्र लिहिताना,वेळ थांबलेली वाटते,परंतु आठवणी कायम असणार…

मन अजूनही मान्य करायला तयार नाही की तुम्ही आपल्यात नाहीत. गेली ३० – ३५ वर्षे तुमच्यासोबतचा प्रवास माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता. विद्यार्थी संघटनेचा एक साधा कार्यकर्ता म्हणून पहिल्यांदा तुमच्यासमोर आलो, तेव्हा मी युवक काँग्रेस, ठाणे महापालिकेतील नगरसेवक म्हणून कामाला सुरुवात केली होती.

दादा,बारामतीला आलो की तुमच्यासोबतच्या भेटीगाठीफक्त राजकारणापुरत्या कधीच नव्हत्या.काम कसं करावं, स्वच्छता कशी ठेवावी,आणि माणसांशी नातं कसं जपावंहे सगळं मी तुमच्याकडून शिकलो.तुमचं प्रेम मनापासून असायचं.“प्रतापला मदत करायचीय,”असं तुम्ही हसत म्हणायचात,आणि मी मागे वळून पाहिलं कीतुमचं भक्कम पाठबळ कायम माझ्या पाठीशी उभं असायचं. तुमची मुलं मित्र आहेतच परंतु पवार कुटूंबाशी देखील अत्यंत जवळचे संबंध देखील आहेत. कारण नाती कशी जपायची हे तुम्ही केवळ सांगितलं नाही,तर जगून दाखवलंत.

जुलै २००८ मधला सिद्धिविनायक मंदिरातील तो दिवस,रत्नजडीत मोबाईलचा तो प्रसंग…तो मोबाईल नव्हता दादा,तो माझ्या मनातलं तुमच्यावर असलेलं प्रेम होतं.आजही लोक त्या घटनेमुळे मला ओळखतात,आणि त्यामागे तुमचंच नाव आहे. कालचं कॅबिनेटची बैठक संपल्यानंतरमी तुम्हाला ९ तारखेचं आमंत्रण दिलं…आणि आज तुम्ही नाहीत…हे अजूनही खरं वाटत नाही.आमच्या नात्यात कधी कोणी आड आलं नाही.राजकारणाच्या पलीकडे जाऊनतुम्ही मला आपलंसं केलंत.तो विश्वास, ते प्रेममी आयुष्यभर जपेन.

दादा,तुमचं जाणं म्हणजेफक्त एका मोठ्या नेत्याचं नाही,तर माझ्या आयुष्यातीलएका मार्गदर्शकाचं,एका आपुलकीच्या माणसाचं जाणं आहे.तुमच्या आठवणी, शिकवणआणि दिलेला विश्वासमाझ्या प्रत्येक पावलात कायम सोबत राहील.भावपूर्ण श्रद्धांजली दादा…तुमची उणीव शब्दांत मांडता येणार नाही.

अशा शब्दांत प्रताप सरनाईक यांनी अजित पवारांविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.