scorecardresearch

मुंब्य्रात गर्भवती तरुणीची प्रियकराकडून हत्या ; आरोपी अटकेत

मुंब्रा येथील कौसा भागात शनिवारी २२ वर्षीय गर्भवती मुलीची तिच्या प्रियकराने चाकूने गळा चिरून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मुंब्य्रात गर्भवती तरुणीची प्रियकराकडून हत्या ; आरोपी अटकेत
प्रतिनिधिक छायाचित्र

मुंब्रा येथील कौसा भागात शनिवारी २२ वर्षीय गर्भवतीची तिच्या प्रियकराने चाकूने गळा चिरून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी संशयित आरोपी अल्तमश दळवी (२४) याला अटक केली आहे.

मुंब्रा येथील कौसा भागात शनिवारी सायंकाळी एका २२ वर्षीय मुलीचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह स्थानिक रहिवाशांना आढळून आला होता. स्थानिकांनी तात्काळ या घटनेची माहिती मुंब्रा पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळेस हा मृतदेह याच परिसरात राहणाऱ्या तरूणीचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

तिच्या ओळखीतील व्यक्तींना तिची माहिती विचारली असता तिचे मागील दोन वर्षांपासून अल्तमश दळवी (२४) या मुलासोबत तिचे प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी खबऱ्यांचे जाळे पसरवून अल्तमशचा शोध घेण्यास सुरूवात केली. तो ठाणे रेल्वे स्थानकात असून पळून जाण्याच्या बेतात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पथकाने त्याला ठाणे स्थानकातून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, ती गर्भवती असल्याचे तसेच मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये काही कारणास्तव वाद सुरु होते.या वादातून त्याने तिची हत्या केल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी अल्तमशला अटक केली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pregnant girl killed by boyfriend in mumbra amy

ताज्या बातम्या