साहित्य, संस्कार आणि संस्कृती यांनी मराठी भाषा भरलेली आहे. या भाषेच्या माध्यमातून मुलांवर आपोआप संस्कार आणि संस्कृतीची जपणूक होते. त्यामुळे अलीकडे मराठी शाळांमध्ये दाखल होण्याचा मुलांचा ओढा वाढत आहे, असे प्रतिपादन मराठी शाळांच्या सदिच्छादूत आणि अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी येथे काढले. कल्याण पूर्वेतील नूतन ज्ञानमंदिर शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

हेही वाचा- कल्याणमध्ये बेकायदा इमारतीमधील घर विक्री करणाऱ्या विकासकावर गुन्हा

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
english medium schools in pune advertising on social media to attract students
पुणे: इंग्रजी शाळांवर समाजमाध्यमांत जाहिराती करण्याची वेळ… नेमके झाले काय?
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

इंग्रजी शाळांकडे मराठी मुलांचा, पालकांचा ओढा अधिक असल्याचे चित्र दिसत असले तरी करोना महासाथीनंतर मराठी शाळांमध्ये दाखल होणाऱ्या मुलांचे प्रमाण वाढले आहे. मराठीतून शिक्षण घेत असताना आपली उपजत कौशल्य, भाषक कौशल्य विकसित होत असतात. मराठी तोंडी लावण्यापुरती नाही तर ती ज्ञान भाषा आहे, असे अभिनेत्री सुमित यांनी सांगितले. या कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. मंदार भानुसे, मुख्याध्यापिका मीनाक्षी गागरे, उपमुख्याध्यापक बबन निकम, पर्यवेक्षक विजय भामरे, शालेय समिती सदस्य फडके उपस्थित होते.

हेही वाचा- पनवेल : पालिका सेविकेच्या सतर्कतेमुळे बालविवाहाचे प्रकरण उघडकीस, गुन्हा दाखल

मराठी शाळांमध्ये देण्यात येत असलेले शिक्षण हे आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पूरक आहे. मराठी भाषेत शिक्षण घेऊन इंग्रजीचा सराव सुरू ठेवला तर उत्तम इंग्रजी लिखाण, बोलता येते. याचीही जाणीव पालकांना होऊ लागली आहे. त्यामुळे करोना महासाथीनंतर पालकांना मराठी शाळेत मुलांना दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. मराठी शाळांकडे वळा, तेथील पटसंख्या वाढवा, असे आवाहन अभिनेत्री सुमित यांनी केले.
माझ्यासह माझ्या कुटुंबीय, मुलांचे शिक्षण मराठीतून झाले आहे. मराठी शाळेत शिक्षक शिकवतात तेव्हा मुलांना त्यांच्यात आपल्या आई, वडिलांसारखी जवळीक दिसून येते. तणावमुक्त शिक्षण या शाळेत मिळते. उज्जवल यशासाठी मराठी शाळेतून शिक्षण हाही एक उत्तम मार्ग आहे. मातृभाषेत आपण जेव्हा पारंगत होऊ तेव्हा आपण जगाची भाषा शिकू शकू, असे त्या म्हणाल्या. यावेळी विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.