संधी आणि आव्हानांची सांगड घालून ठाणे शहराच्या समस्या सोडविणार, नवनिर्वाचित ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे प्रतिपादन | problems of Thane city will solved possible Statement Thane Municipal Commissioner Abhijit Bangar | Loksatta

संधी आणि आव्हानांची सांगड घालून ठाणे शहराच्या समस्या सोडविणार, नवनिर्वाचित ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे प्रतिपादन

शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येऊ शकतील, याचा अभ्यास करून त्याआधारे कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही अभिजित बांगर म्हणाले

संधी आणि आव्हानांची सांगड घालून ठाणे शहराच्या समस्या सोडविणार, नवनिर्वाचित ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे प्रतिपादन
संधी आणि आव्हानांची सांगड घालून ठाणे शहराच्या समस्या सोडविणार, नवनिर्वाचित ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे प्रतिपादन

ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त तसेच प्रशासक पदावर नियुक्ती झाल्यानंतर अभिजीत बांगर यांनी शुक्र‌वारी दुपारी पालिका मुख्यालयात येऊन आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतली. प्रत्येक शहरात संधी आणि आव्हाने असतात. या दोघांची एकत्रित सांगड घालून शहराच्या समस्या सोडवायच्या असतात. तशाचप्रकारे ठाणे शहरातील समस्या सोडविण्यासाठी काम करणार असल्याचे आयुक्त बांगर यांनी यावेळी सांगितले. तसेच शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येऊ शकतील, याचा अभ्यास करून त्याआधारे कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. अनधिकृत बांधकामाच्या समस्येबाबत अभ्यास करुन त्यावर मार्ग काढला जाईल आणि वृक्ष लागवडीचा वेगळा प्रयोग ठाण्यातही करण्याचा प्रयत्न असणार आहे, असेही ते म्हणाले.

ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागेवर नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांची राज्य सरकारने नियुक्ती केली आहे. शुक्रवारी दुपारी बांगर यांनी ठाणे महापालिका मुख्यालयात येऊन डाॅ. शर्मा यांच्याकडून आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतली. यानंतर त्यांनी पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद सांधला. प्रत्येक शहरात संधी आणि आव्हाने असतात. या दोघांची सांगड घालून शहराच्या समस्या सोडवायच्या असतात. गेल्या काही वर्षात ठाणे शहराचा विकास झपाट्याने झाला असून हे शहर माझ्यादृष्टीने वैशिष्टयपुर्ण आहे. या शहरात काही संधी आणि आव्हाने आहेत. संधी अशी आहे की, हे शहर पारंपारिक आहे.

हेही वाचा : अभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार

या शहराबद्दल नागरिकांना अभिमान असून ते शहरातील कामांकरिता नेहमी सज्ज असतात. त्यांचा शहराच्या विकासात सहभाग असतो. या नागरिकांमध्ये शहराबद्दलचा अभिमान आणखी दृढ कसा करता येईल, या दृष्टीने काम करणार आहे. तसेच शहरातील आव्हानांबद्दल पहिल्याच दिवशी सांगता येणार नाही. पण, या शहरात खुप आव्हाने आहेत. संधी आणि आव्हाने यांची एकत्रित सांगड घालून शहरातील समस्या सोडवायच्या असतात. त्याचप्रकारे ठाणे शहरातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे शहराचे असल्यामुळे आम्हाला त्यांची चांगली मदतच होणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असल्यामुळे त्यांच्या करवी शहराच्या विकासासाठी शासनाकडून निधी मिळू शकतो. त्यांच्याकडे दूरदृष्टी असून त्याबाबत आपल्याला समजले तर निश्चितच शहराचा विकास करण्यात काहीच अडचणी येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : पालिकेचे नियम कर्मचाऱ्यांच्या शिस्तीसाठी पण, त्रास मात्र सर्वसामान्य ठाणेकरांना

ठाणे शहरात वाहतूक कोंडीची समस्या जाणवत आहे. काही ठिकाणी अरुंद रस्त्यांमुळे तर काही ठिकाणी इतर कारणांंमुळे वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी नेमकी कशामुळे होते, याचा अभ्यास करून त्यावर पर्याय शोधून कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. देशातील कुठलीही सार्वजनिक वाहतुक व्यवस्था ही नफा ना तोटय़ा या तत्वावर चालविण्यात येते. परंतु त्यातही नागरिकांना सेवा आणि सुरक्षा कशाप्रकारे देता येईल, याचा विचार केला जातो. त्यामुळे ठाणे परिवहन सेवा सुधारण्यासाठी अभ्यास करून त्याप्रमाणे काही बदल करण्यात येतील. विजेवरील बसगाड्या येणार असतील तर त्याकरिता चार्जींग स्थानके उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील. अनधिकृत बांधकामाच्या समस्येबाबत अभ्यास करुन त्यावर मार्ग काढला जाईल. वृक्ष लागवडीचा वेगळा प्रयोग ठाण्यातही करण्याचा प्रयत्न असणार आहे. शहरात अर्बन फॉरेस्ट म्हणून विकसित करणे अपेक्षित असून त्याचबरोबर वृक्ष उन्मळून पडू नयेत म्हणून देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मुंबई नाशिक महामार्गावर टेम्पो चालकाला लुटण्याचा प्रयत्न ; दोघांना अटक

संबंधित बातम्या

ठाणे: कोपरी पूलाच्या तुळई बसविण्याचे काम पूर्ण; आता पुन्हा वाहतूक बदलाची आवश्यकता नाही
‘मफतलाल’च्या जागाविक्रीस मंजुरी
वसाहतीचे ठाणे : स्मार्ट डोंबिवलीचे छोटे प्रारूप
शिवसेनेच्या धनुष्यबाणावरुन वाद कशाला म्हणणाऱ्या शरद पवारांना फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “पवारांनी पक्ष बदलला त्यावेळी…”
कल्याणचे बोगस तिकीट तपासणीस कसारा रेल्वे स्थानकात अटक

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पोलीस उपनिरीक्षक विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेची निवड यादी जाहीर; यंदा डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शारीरिक चाचणी
‘मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या निर्णयाला जाणीवपूर्वक उशीर’; शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचा आरोप
विजय दिवस सोहळ्यात यंदा भरगच्च कार्यक्रम; रौप्यमहोत्सवानिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, शरद पवार यांना निमंत्रण
FIFA WC 2022: मोक्याच्या क्षणी ह्वांग ही चॅन चा गोल! द. कोरिया बाद फेरीत दाखल, मात्र जिंकूनही उरुग्वे विश्वचषकातून बाहेर
‘आमच्यात एक साम्य आहे, ते म्हणजे आम्ही दोघेही…’ सिद्धार्थने सांगितला रणवीर सिंगचा ‘तो’ किस्सा