ठाणे पोलीस आयुक्त फणसळकर यांची बढती आणि बदली

विवेक फणसळकर यांना पदोन्नती

राज्यातील तीन बड्या पोलीस अधिकाऱ्यांना बदल्यांसोबत बढती देण्यात आली आहे. या बदल्यामध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अप्पर पोलीस महासंचालक संदीप बिश्नोई आणि अप्पर पोलीस महासंचालक विशेष कृती अभियान के वेंकटेशम यांचं नाव आहे. विवेक फणसळकर यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबई येथे वर्णी लावण्यात आली आहे. तर के. वेंकटेशम यांची संचालक, नागरी संरक्षण आणि संदीप बिश्नोई यांची महासंचालक (न्यायिक व तांत्रिक) विभाग येथे पदोन्नती झाली आहे. विवेक फणसळकर यांच्या पदोन्नतीमुळे रिक्त होण्याऱ्या ठाणे शहर पोलीस आयुक्तपदाचा अतिरिक्त भार सह पोलीस आयुक्त सुरेश मेखला यांच्यावर पुढील आदेश येईपर्यंत सोपण्यात आला आहे.

विवेक फणसळकर यांची ३१ मार्च २०१८ रोजी ठाणे पोलीस आयुक्तलायात पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला होता. सुमारे पावणे दोन वर्ष त्यांनी ठाणे शहर आयुक्त पदाचा कार्यभार सांभळला. करोना काळात जीवाची बाजी लावून जनतेचा जीव वाचण्याऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. कर्तव्य बजावताना दुर्दैवी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना थेट नियुक्ती पत्र देण्याचा अभिनव उपक्रम त्यांनी राबविला होता. त्यांच्या या उपक्रमाचं राज्यभर कौतुक झालं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Promotion and transfer of thane police commissioner phansalkar rmt

Next Story
सोनावणेंच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा
ताज्या बातम्या