प्रेषित मोहम्मद यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपातील निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचं समर्थन केल्याप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. भिवंडीमधील साद अन्सारी याला अटक करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच नुपूर शर्मा यांचं समर्थन करणाऱ्या आणखी एका व्यक्तीला भिवंडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा प्रकार आहे.

Prophet Row: भिवंडीमधील तरुणाची नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट, घराबाहेर मोठा जमाव; शहरात खळबळ

नारपोली भागात २२ वर्षीय तरुण राहतो. त्याने त्याच्या फेसबुक खात्यावर नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारे स्टेटस ठेवले होते. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याच्याविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी अशाचपद्धतीने नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या साद अन्सारी याला पोलिसांनी अटक केली होती.