प्रेषित मोहम्मद यांचा अवमान करणारं विधान करणाऱ्या भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाजमाध्यमावर पोस्ट करणाऱ्या साद अन्सारी याला भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे. साद याच्या पोस्टनंतर संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण पसरले होते. संतप्त जमाव साद याच्या घरीही गेले होते. साद याला पोलिसांनी तात्काळ अटक केल्याने हिंसा टळल्याचे बोलले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Prophet row: प्रयागराज हिंसाचारातील आरोपीचे घर जमीनदोस्त, सापडली शस्त्रं; भिवंडीत तरुणाला घेराव; ५ महत्वाचे मुद्दे

प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत विधान करणाऱ्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात मुंबई, ठाणे, भिवंडीत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातच भिवंडीतील साद अन्सारी नावाच्या एका व्यक्तीने त्याच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर नुपूर शर्माच्या विधानाला समर्थन देणारी एक पोस्ट प्रसारित केली. त्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली. या घटनेनंतर जमाव त्याच्या घराबाहेर जमला होता. परंतु त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. साद विरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prophet row police arrest youngster over social media post supporting nupur sharma sgy
First published on: 13-06-2022 at 09:32 IST