ठाणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नातवासंबंधी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर ठाण्यातील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी थेट मनोरुग्णालयातील दोन खाटा आरक्षित करत आंदोलन केले. यातील एक खाट उद्धव ठाकरे यांच्यासाठी आणि दुसरी खाट मुख्यमंत्र्यांच्या कामामुळे मानसिक धक्का बसलेल्यांसाठी आहे. असे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात भाषण करताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नातवासंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. यानंतर शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्याविरोधात टिका केली जात आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटातील महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे आणि आणि त्यांच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या मनोरुग्णालयात जाऊन दोन खाटा आरक्षित केल्या आहेत. यापैकी एक खाट थेट उद्धव ठाकरे यांच्यासाठी राखीव असल्याचे मीनाक्षी शिंदे यांनी सांगितले. दीड वर्षाच्या बाळावर ज्यांनी टीका केली त्यांची मानसिक स्थिती नक्कीच चांगली नसणार आणि ती चांगली व्हावी यासाठी मनोरुग्णालयात ही खाट आरक्षित करत असल्याचे त्या म्हणाल्या. तर दुसरी खाट मुख्यमंत्र्यांच्या कामामुळे ज्यांना मानसिक धक्का बसेल अशासाठी राखून ठेवल्याचे मिनाक्षी शिंदे म्हणाल्या.

women office bearers of Thackeray group in Kalyan join Shindes Shiv Sena
कल्याणमध्ये ठाकरे गटाला धक्का, महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश
Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
Chandrakant Patil instructs angry workers to leave the hall in maval
महायुतीच्या मेळाव्यात ‘मानापमान’ नाटय़; चंद्रकांत पाटील यांच्याकडून ‘नाराज’ कार्यकर्त्यांना सभागृहाबाहेर जाण्याची सूचना
Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा