अंबरनाथ रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर तीनवर १५ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास एक तरुण अचानक जमीनीवर कोसळला. यावेळी कर्तव्यावर असलेले रेल्वे पोलीस दलातील जवान मोहन दास यांनी तातडीने या तरुणाला मदत केली. दास यांनी या बेशुद्धावस्थेत पडलेल्या तरुणाला शुद्धीत आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र अनेक प्रयत्न करुनही हा तरुण शुद्धीत येत नसल्यामुळे अखेर दास यांनी त्याला सीपीआर दिले आणि काही वेळाने तो शुद्धीवर आला. महेश सुर्वे असं या तरुणाचे नाव असून त्याला प्राथमिक उपचार दिल्यानंतर नातेवाईकांना बोलावून घरी पाठवण्यात आले. रेल्वे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे एका प्रवाशाचे प्राण वाचल्याने रेल्वे पोलिसांचे कौतुक होत आहे.

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

illegal construction in green zone near Kopar railway station in Dombivli
डोंबिवलीत कोपर रेल्वे स्थानकाजवळील हरितपट्ट्यात बेकायदा बांधकामाची उभारणी
Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
dombivli, central railway trains running late marathi news
डोंबिवली: ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वे सेवा कोलमडली
A young motorman who tried to commit suicide at Bandra station on Western Railway was saved by a motorman Mumbai news
मुंबई: मोटरमनच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचा वाचला जीव