पालघरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

राज्याच्या वेगवेगळया भागात सध्या अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे.

राज्याच्या वेगवेगळया भागात सध्या अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. पालघर तालुक्यात आज सकाळी नऊ वाजता अचानक पाऊस सुरु झाला. या पावसामुळे नागरिकांची तसेच अनेक व्यवसायिकांची भंबेरी उडाली. पालघर, माहीम, केळवे रोड इत्यादी परिसरात सुमारे दहा ते पंधरा मिनिट मुसळधार पाऊस कोसळला.

राज्याच्या वेगवेगळया भागात सध्या अवकाळी पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rain in palghar district dmp