शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहित गंभीर आरोप केले आहेत. ठाण्यातील गुंड राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीला आपल्यावर हल्ला करण्याची खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून सुपारी देण्यात आल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. संजय राऊत यांच्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली असून, आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. अशातच राजा ठाकूरच्या पत्नीने संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

राजा ठाकूरला गुंड संबोधल्याने पत्नी पूजा ठाकूर यांनी कापूर बावडी पोलीस स्टेशनमध्ये संजय राऊतांविरोधात तक्रार दिली आहे. त्यानंतर पूजा ठाकूरांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना सांगितलं की, “संजय राऊतांनी माझ्या पतीला गुंड संबोधित केल्याने तक्रार दाखल केली. माझ्या पतीला गुंड बोलणारे संजय राऊत कोण आहेत. त्यांच्याकडे काय पुरावा आहे. कोणीतरी तुम्हाला संपर्क केली आणि तुम्ही वक्तव्य करत आहात, त्याला अर्थ नाही.”

devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
narayan rane marathi news, deepak kesarkar marathi news
वैयक्तिक स्वार्थापोटी अपशकून करत असेल तर पर्वा करणार नाही, नारायण राणे यांचा मित्र पक्षाच्या नेत्यांना टोला
nia denies allegations of unlawful actions in bengal s bhupatinagar
छाप्यांमागे दुष्ट हेतू नाही! आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीनंतर ‘एनआयए’चा खुलासा

हेही वाचा : “देवेंद्र फडणवीस एका गुंडाची…”, ‘त्या’ विधानावर संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया!

“तुम्ही पुरावे आणि सर्व गोष्टी समोर आणा. संजय राऊतांविरुद्ध आयीपीसी कलम २११ आणि कलम १२० ब अंतर्गत अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यावर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी,” अशी मागणी पूजा ठाकूरांनी केली आहे.

हेही वाचा : ‘एकाची निर्घृण हत्या, जन्मठेपेची शिक्षा अन् शहरभर दहशत’; राऊतांनी उल्लेख केलेला गुंड ‘राजा ठाकूर’ नेमका आहे कोण?

राज ठाकूर याचं श्रीकांत शिंदेंशी काय नात आहे? या प्रश्नावर पूजा ठाकूरांनी म्हटलं, “कळवा महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून मी निवडणूक लढली आहे. तेव्हा आठवलं नाही, कोणत्या पक्षात आणि गटात होती. पण, यांचं वाद-विवाद वाढत आहेत. माझ्या प्रभागातील कामाच्या निमित्ताने श्रीकांत शिंदेंच्या नेहमी संपर्कात असते. लोकांचं कार्य आणि मदत करतो, याचा अर्थ असा नाही की कट रचत आहेत. तसेच, गृहमंत्र्यांनी माझ्या अर्जाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी,” असेही पूजा ठाकूर म्हणाल्या.