ठाणे – ठाणे महापालिकेने आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीपेक्षाही कमी कालावधीत ६६ दिवसांत २०० कोटी रुपयांची विक्रमी मालमत्ता कर वसुली केली आहे. ठाणेकरांनी मालमत्ता कर भरणा करण्यास दिलेला प्रतिसाद प्रशंसनीय असल्याचे मत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी व्यक्त केले आहे. तर या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मालमत्ता कर वसुली विभागाने २०० कोटी इतकी मालमत्ता कर वसुली केली असून, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. तसेच मालमत्ता कराच्या वसुलीबाबत सातत्याने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असून, यावर्षी एक हजार कोटींची वसुली करण्याचा कर विभागाने प्रयत्न कराव, असे मत पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी व्यक्त केले.

ठाणे शहरातील नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोईचे व्हावे यासाठी सर्व प्रभाग समिती कार्यालयांत कर संकलन केंद्रे कार्यान्वित करण्यात आली होती. तसेच कार्यालयीन वेळेत, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सदर केंद्रे सुरू ठेवण्यात आली आहेत. मालमत्ता कराची देयके प्रभाग समितीनिहाय सर्व मालमत्ता धारकांना वितरीत करण्यात येत असून, मालमत्ता देयके संबंधितांना प्राप्त झालीत की नाही, याची खातरजमा करून कर भरण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. तर यंदा ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला ९०० कोटी इतके वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

Kapil Dev Says Some people will suffer but no one is bigger than the country
Kapil Dev : “काही लोकांना त्रास होईल, परंतु देशापेक्षा कोणीही…”, कपिल देव यांनी बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयाचे केले स्वागत
houses sold in Mumbai
मुंबईमध्ये फेब्रुवारीत ११ हजार ८३६ घरांची विक्री, मागील १२ वर्षांतील फेब्रुवारीमधील सर्वाधिक घरविक्री
In the name of share trading two highly educated people were cheated of two and a half crores
पनवेल: शेअर ट्रेडींगच्या नावाखाली दोन उच्चशिक्षितांना सव्वा दोन कोटींचा गंडा
akola, Senior Civil Court, Defamation Suit, Dismisses, Intak Leader, bjp and shinde group, mla,
आजी-माजी आमदारांचा इंटक नेत्यांवरील अब्रुनुकसानीचा दावा…नेमकं प्रकरण काय?

हेही वाचा – डोंबिवलीत विजयनगर सोसायटी भागातील काँक्रीटचा रस्ता खचला

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना मालमत्ता करसंलग्न सोयी सुविधा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये करदाते त्यांच्या घरातून अथवा कार्यालयातून इतर ठिकाणाहून मालमत्ता करसंलग्न सर्व सुविधांचा वापर करण्यात येणार आहे. मालमत्तेवर किती कर प्रलंबित आहे, जर दंड लागू करण्यात आला असेल तर त्याची रक्कम किती आहे, मालमत्ता कर भरणा कोणकोणत्या पद्धतीने करता येईल, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे नागरिकांना महानगरपालिकेच्या वेबसाईटद्वारे घरच्या घरी मिळू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तर मालमत्ता कर भरण्यासाठी ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयात संकलन केंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत. त्याशिवाय, ऑनलाइन कर भरणा सुविधाही कार्यरत आहे. करदाते त्यांच्या देयकाची संगणकीय प्रत propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे अथवा प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्रावरून उपलब्ध करून घेऊ शकणार आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत ९० टक्के वाढ

२०२२ – २३ या आर्थिक वर्षात दिनांक ७ जून २०२२ रोजी १०८.३५ कोटींची वसुली झाली होती. त्या तुलनेत यंदा ९२.२२ कोटी इतकी वाढीव वसुली म्हणजेच ९० टक्के इतकी आहे. या वर्षी आतापर्यत एकूण १ लाख ५१ हजार ५३६ इतक्या मालमत्ताधारकांनी कर भरणा केलेला आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिव्यातील दौऱ्यावरून भाजप आक्रमक

प्रभाग समिती कर भरणा (कोटी रुपयांमध्ये)

२०२३-२४, २०२२-२३

माजीवडा-मानपाडा – ६६.०४, २६.४७

वर्तक नगर – ४२.४०, २६.५३

नौपाडा-कोपरी – २९.८१, १७.७९

उथळसर – १६.५७, ९.६१

लोकमान्य नगर-सावरकर नगर – ९.९७, ३.४८

कळवा – ७.५४, ३.२७

दिवा – ६.६९, ३.१६

वागळे इस्टेट – ७.२४, २.९५

मुंब्रा – ७.१६, ३.८७

मुख्यालय – ७.१५, ११.२२

करभरणा – रक्कम

ऑनलाईन – ८५.६७ कोटी

धनादेश – ८३.३९ कोटी

रोख – २२.६७ कोटी

डीडी – १४.२० कोटी

कार्ड पेमेंट – ०.१९ कोटी