लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: नव्यानेच उभारण्यात आलेल्या डोंबिवलीतील शीळ रस्त्यावरील गोळवली येथील रिजन्सी अनंतम या सुमारे चार हजार लोकांची वस्ती असलेल्या गृहसंकुलात मागील पाच दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट असल्याने रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या पाणी टंचाईचा जाब विचारण्यासाठी रविवारी रहिवाशांनी प्रकल्प उभारणाऱ्या विकासकाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. तेथे रहिवाशांना सुरळीत पाणी पुरवठ्याविषयी ठोस आश्वासन न मिळाल्याने रहिवाशांचा हिरमोड झाला.

Nashik, Teams inspection, auction,
नाशिक : खासगी जागेवर कृषिमाल लिलावामुळे तपासणीसाठी पथके नियुक्त
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
houses in Worli BDD
वरळी बीडीडीतील अंदाजे ५५० घरांचा ताबा वर्षाखेरीस, ३३ पैकी १२ इमारतींची कामे सुरु
Exposed falsehood through RTI Commencement order of Lower Panganga Project without approval of Water Commission
यवतमाळ : माहिती अधिकारातून खोटारडेपणा उघड! जल आयोगाच्या मान्यतेशिवाय निम्न पैनगंगा प्रकल्पासाठी…

रिजन्सी अनंतम गृहसंकुलात २४ तास पाणी, सर्व प्रकारच्या सुविधा मिळतील, असे आश्वासन विकासकाने दिले होते. सुरुवातीचे काही दिवस दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पाणी पुरवठा होत होता. अलीकडे काही महिन्यांपासून संकुलाला कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू झाला आहे. मागील चार दिवसांपासून संकुलातील काही इमारतींना पाण्याचा एक थेंबही मिळाला नसल्याचे येथील रहिवासी पुरुषोत्तम आठलेकर यांनी सांगितले.

हेही वाचा… जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक तडीपार

दोन महिन्यापूर्वीही असाच प्रकार या संकुलात निर्माण झाला होता. त्यावेळीही रहिवाशांनी मोर्चा काढला होता. ७० लाखाहून अधिक रकमा मोजून रहिवाशांनी या संकुलात घरे घेतली आहेत. त्यामुळे या संकुलाला नियमित सुरळीत पुरेसा पाणी पुरवठा होईल याची काळजी विकासकाने घेणे आवश्यक आहे. प्रत्येकवेळी एमआयडीसीकडे पाठपुरावा सुरू आहे, अशी कारणे देऊन रहिवाशांनी किती काळ पाणी टंचाई सामोरे जायचे, असा प्रश्न रहिवासी लता अरगडे यांनी केला.

हेही वाचा… ‘सीआयएससी’ निकालात मुंबई-ठाण्याची बाजी, प्रथम क्रमांक मिळवणाऱ्यांत तीन मुलींचा समावेश

रिजन्सी अनंतम संकुलात २१ इमारती आहेत. प्रत्येक इमारतीत १८२ सदनिका आहेत. सुमारे चार ते पाच हजार लोकवस्ती या भागात आहे. डोंबिवली शहराबाहेरील शांत, निवांत ठिकाण म्हणून रहिवासी या भागाला प्राधान्य देत आहेत. आता या ठिकाणी पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाल्याने रहिवाशांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

हेही वाचा… अंबरनाथ: मनसेची बदलापूर, उल्हासनगर कार्यकारिणी बरखास्त; पक्षांतर्गत गटबाजीमुळे राज ठाकरे यांचा निर्णय

रविवारी सकाळी रिजन्सी अनंतम संकुलातील सुमारे चार हजार रहिवासी मुबलक पाण्याच्या मागणीसाठी विकासकाच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन धडकले. पाण्याचा मुबलक पुरवठा होत नाही तोपर्यंत हटणार नाही अशी आक्रमक भूमिका घेऊन बसले. आपल्या संकुलाला एमआयडीसीकडून पाणी पुरवठा केला जातो. पुरवठा वाढविण्यासाठी एमआयडीसीकडे पाठपुरावा करत आहे, असे आश्वासन विकासकाकडून रहिवाशांना देण्यात आले. या आश्वासनावर रहिवाशांचे समाधान झाले नाही. त्यामुळे रहिवासी संतप्त झाले. रहिवाशांचा आक्रमक सूर पाहून विकासक निघून गेला. काही महिन्यापूर्वी असा पाण्याचा प्रश्न रिजन्सी संकुलात निर्माण झाला होता. आता तेथील पाणी पुरवठा पूर्ववत झाला आहे.

राजकीय वादामुळे, टँकर समुहाच्या फायद्यासाठी असे पाणी टंचाईचे प्रश्न निर्माण केले जात आहेत, असे या भागातील रहिवाशांचे म्हणणे आहे. मोर्चामुळे सोमवारी सकाळी रिजन्सी अनंतम संकुलाला पुरेसा पाणी पुरवठा झाला, असे रहिवाशांनी सांगितले.