परतीच्या पावसाने शेतमालाचे नुकसान केल्याने दराची शंभरी

ऑक्टोबर महिन्याच्या मध्यावर झालेल्या पावसामुळे पुणे आणि नाशिक जिल्ह्यतील शेतमालाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याने मुंबई, ठाणे, पुणे शहरातील घाऊक आणि किरकोळ भाज्या कडाडल्या आहेत. घाऊक बाजारात भाज्यांच्या दरात वाढ होताच किरकोळीत फ्लॉवर, कोबी, भेंडी, टॉमेटो यासारख्या भाज्या किलोमागे ८० ते १०० रुपयांनी विकल्या जात आहेत.

Yavatmal lashed by stormy rain early morning Water in low lying areas
यवतमाळला भल्यापहाटे वादळी पावसाचा तडाखा; सखल भागात पाणी
Unseasonal weathe hail in Vidarbha Three districts of Marathwada are also affected by rain
विदर्भात अवकाळी, गारपीट; मराठवाडय़ाच्या तीन जिल्ह्यांनाही पावसाचा तडाखा
thane district, administration, thane water supply department
लोकसत्ता इम्पॅक्ट : ठाणे जिल्हा प्रशासन जागे झाले, पाणी टंचाई आधीच टँकर सुरू करण्याच्या दिल्या सूचना
Mild earthquake tremors in Akola district
अकोला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य हादरे

मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात पुणे तसेच नाशिक जिल्ह्यांतून भाज्यांचा पुरवठा होतो. कल्याण, डोंबिवली तसेच इतर उपनगरांना पुण्यातील चाकण, नारायणगाव तसेच नाशिक जिल्ह्यातून भाज्यांचा पुरवठा होतो. पुणे शहरास सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच नाशिक जिल्ह्यांतूनही भाज्यांचा पुरवठा होतो. राज्यभरातील या बागायती पट्टयाला गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला असून, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच भाज्यांच्या दरात सातत्याने वाढ होऊ लागली . परतीच्या पावसाने फळभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे घाऊक बाजारात भाज्यांचा पुरवठा रोडावला असून दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे, अशी माहिती वाशी येथील घाऊक बाजारातील व्यापारी गोपीनाथ मालुसरे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले आहे.  गेल्या महिनाभरापासून भाज्यांचे भाव चढे असून, किरकोळीत काही भाज्या १०० रुपयांनी विकल्या जात आहेत, असे मालुसरे यांनी स्पष्ट केले. आणखी काही दिवस भाज्यांचे भाव चढे राहणार असल्याचेही ते म्हणाले.

किरकोळीत भाव दुपटीहून अधिक 

परतीच्या पावसाने फळभाज्या खराब झाल्या आहेत. यंदा पुणे जिल्ह्य़ासह राज्याच्या विविध भागात परतीचा पाऊ स झाला. पावसाने शिवारातील फळभाज्या खराब झाल्या. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खराब झालेल्या फळभाज्या फेकून दिल्या. आवक कमी आणि परतीच्या पावसाचा फटका बसल्याने फळभाज्यांचे भाव गगनाला भिडले, असे गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील प्रमुख विRे ते विलास भुजबळ यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. दरम्यान, दिवाळीमुळे आवक आणखी कमी झाली आहे, अशी माहिती किरकोळ बाजारातील विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले. सणासुदीच्या काळात फळभाज्यांचे भाव वाढल्यामुळे सामान्य हवालदिल झाले आहेत.

किरकोळ बाजारातील

भाज्यांचे       प्रतिकिलोचे भाव

बटाटा           १५-१८

कांदा            ४०-४५ (जुना),

२२ ते ३० (नवीन)

फ्लॉवर         १००-१२०

कोबी            ७०-८०

टोमॅटो          ४०-५०

आले            ७०-८०