Robbery at a diamond shop in Vdarli village near Dombivli | Loksatta

ठाणे : डोंबिवलीजवळील व्दारली जेथे जवाहिऱ्याच्या दुकानावर दरोडा

कामगार आणि दुकान मालकाने ओरडा करताच परिसरातील नागरिक जमा झाल्याने आपण पकडले जाऊ या भीतीने दरोडेखोरांनी एका चारचाकी वाहनातून पळ काढला.

ठाणे : डोंबिवलीजवळील व्दारली जेथे जवाहिऱ्याच्या दुकानावर दरोडा
डोंबिवलीजवळील व्दारली जेथे जवाहिऱ्याच्या दुकानावर दरोडा (संग्रहित छायाचित्र)

डोंबिवली जवळील २७ गावातील व्दारली गाव येथे सकाळी अकरा वाजता पाच जणांच्या टोळीने एका जवाहिऱ्याच्या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकला. दरोडेखोरांनी दुकानात घुसून कामगारांना मारहाण केली. बंदुकीचा धाक दाखवून काही ऐवज लुटून नेला.

हेही वाचा- कल्याण-डोंबिवलीत रस्ते अडविणाऱ्या वाहन मालकांना वाहतूक विभागाच्या नोटिसा; वाहन जप्तची कारवाई

कामगार आणि दुकान मालकाने ओरडा करताच परिसरातील नागरिक जमा झाल्याने आपण पकडले जाऊ या भीतीने दरोडेखोरांनी एका चारचाकी वाहनातून पळ काढला. दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने दरोडेखोरांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी व्दारली, मलंगगड रोड, उल्हासनगर नाका, शिळफाटा भागात नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दरोडेखोरांनी कामगारांना केलेली मारहाण आणि आरोपींची ओळख पोलिसांना पटली आहे. चार तपास पथके तयार करुन ती रवाना करण्यात आली आहेत. ऐवज लुटण्याच्या की पूर्ववैमनस्यातून हा प्रकार केला आहे याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 18:04 IST
Next Story
कल्याण डोंबिवली पालिकेत दर दोन महिन्यांनी साहाय्यक आयुक्तांच्या बदल्या; सततच्या बदल्यांमुळे प्रभागातील कामकाजावर परिणाम