ठाकुर्लीत डॉक्टरच्या दवाखान्यात चोरी

आयुर्वेदिक डाॅक्टरच्या दवाखान्याच्या प्रवेशद्वाराचे शटर, कुलूप तोडून दवाखान्यातील किमती वस्तू चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत.

robbery at doctors clinic
प्रतिनिधिक छायाचित्र

डोंबिवली– डोंबिवली जवळील ठाकुर्लीतील कांचनगाव येथे एका आयुर्वेदिक डाॅक्टरच्या दवाखान्याच्या प्रवेशद्वाराचे शटर, कुलूप तोडून दवाखान्यातील किमती वस्तू चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. टिळकनगर पोलीस ठाण्यात डाॅक्टरने तक्रार केली आहे.

दिलीप एकनाथ शिंदे (३८) यांचा ९० फुटी रस्ता, साईराज पार्क, ठाकुर्ली येथे दवाखाना आहे. डाॅ. शिंदे स्वता आणि त्यांची डॉक्टर पत्नी दवाखान्यात रुग्ण सेवा देतात. नेहमीप्रमाणे रात्री नऊ वाजता दवाखाना बंद करून डाॅ. शिंदे घरी गेले. त्यानंतर रात्रीच्या वेळेत चोरट्यांनी दवाखान्याचे शटर लोखंडी कटावणीने तोडले. कुलूप फोडले. शटर वाकवून दवाखान्यात प्रवेश केला. दवाखान्यातील रुग्ण सेवेचे किमती साहित्य व इतर सामान असे एकूण १५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दवाखाना परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ९० फुटी रस्त्यावर अलीकडे नियमित पोलीस हॅप्पी स्ट्रीट उपक्रम राबवितात. पोलिसांचा या भागातील वाढता वावर पाहता या भागातील चोऱ्या कमी होण्याऐवजी त्या अलीकडे वाढू लागल्या आहेत, अशा तक्रारी या भागातील रहिवाशांकडून केल्या जात आहेत. पोलिसांनी रहिवासी, पोलिसांच्या मनोरंजना बरोबर दिवसा, रात्रीच्या चोऱ्या कशा कमी होतील यादृष्टीनेही प्रयत्न करावेत, अशी व्यापारी, रहिवासी, व्यावसायिकांची मागणी आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Robbery at doctors clinic in thakurli zws

Next Story
वाहतूक सेवकाच्या सतर्कतेमुळे कल्याणमध्ये बकरी चोर अटकेत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी