डोंबिवली पूर्व रामनगर मधील आनंद बालभवन मध्ये शुक्रवारपासून गुलाबाच्या विविध प्रजातींच्या फुलांचे प्रदर्शन सुरू झाले आहे. रविवारपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. एका हजाराहून अधिक प्रकारची गुलाब पुष्पे या प्रदर्शनात नागरिकांना पाहता येणार आहेत.

हेही वाचा- ठाणे स्थानक परिसर फेरिवालामुक्त लवकरच होणार?, पालिका प्रशासनाकडून आखण्यात येतेय नवे नियोजन

gold
पाडव्याला सुवर्णझळाळी योग; शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
New Year Welcome Kalyan,
कल्याण, डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रांचा उत्साह; ढोल ताशांचा गजर, कलाकारांची उपस्थिती
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर
Crowd of devotees on the occasion of Tukaram Beej sohala in Dehu
पिंपरी : देहूमध्ये तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त भाविकांची अलोट गर्दी

डोंबिवली रोझ फेस्टिव्हल आयोजित या गुलाब पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. यावेळी गुलाब पुष्पप्रेमी कल्याणचे डाॅ. विकास म्हसकर, डाॅ. मेघना म्हसकर उपस्थित होते. मंत्री चव्हाण यांच्या संकल्पनेतून मागील अनेक वर्षापासून हे प्रदर्शन डोंबिवलीत भरविले जाते. धकाधकीच्या जीवनातील नागरिकांना नवीन वर्षाची सुरुवात गोड करता यावी या विचारातून या प्रदर्शनाची दरवर्षी आखणी केली जाते. या प्रदर्शनात मुंबई, पुणे, नाशिक, शहापूर, पनवेल, वांगणी कर्जत भागातून गुलाब पुष्पप्रेमी सहभागी झाले आहेत.

शनिवार, रविवार सकाळी १० ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. एका हजाराहून अधिक गुलाब पुष्पांमध्ये दुरंगी रेघांची, मिनिएचर स्वरुपातील गुलाब पुष्प पाहण्यास मिळणार आहेत. सांगलीच्या गजानन पटवर्धन यांनी गुलाब फुलांच्या टपाल तिकिटांचा संग्रह केला आहे. विविध देशातील ही टपाल तिकिटे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.

हेही वाचा- डोंबिवलीतील टिळकनगर बालक मंदिर शाळेत विद्यार्थ्यांची भाजी मंडई

गुलाब पुष्प स्पर्धेत वांगणीच्या आशीष मोरे यांच्या मोरे नर्सरीतील गुलाब फुलांनी गुलाबांचा राजा व राणी हे पुरस्कार पटकावले. पुणे रोझ फेडरेशनच्या फुलांना राजकुमार, वांगणीच्या चंद्रकांत मोरे नर्सरीला राजकुमारीचा पुरस्कार देण्यात आला. या स्पर्धेत परीक्षक म्हणून डाॅ. विकास म्हसकर, बळवंत ठिपसे, रवींद्र भिडे यांनी काम पाहिले. प्रदर्शनाचे उद्घाटन होत असताना नागरिकांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती.

हेही वाचा- मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावर अपघातांमध्ये वाढ, दोन वर्षात तब्बल इतक्या मृत्यूंची नोंद

नागरिकांमध्ये गुलाब फुले, रोपे यांची आवड निर्माण व्हावी. त्यांनीही अशा पध्दतीने वैविध्यपूर्ण रोपांची लागवड आपल्या घर, परिसर, शेतघरात करावी हाही संदेश समाजात जावा. निसर्ग संवर्धन अशा उपक्रमातून व्हावे हाही या उपक्रमातील उद्देश आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.