गर्भवती महिला ट्रेनखाली जाणार इतक्यात…; पहा कल्याण स्थानकावरील अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

कल्याण रेल्वे स्थानकात आरपीएफ जवानाने दाखलवेल्या सतर्कतेमुळे एका गर्भवती महिलेचा जीव वाचला आहे

RPF, Kalyan Station, कल्याण रेल्वे स्टेशन,
कल्याण रेल्वे स्थानकात आरपीएफ जवानाने दाखलवेल्या सतर्कतेमुळे एका गर्भवती महिलेचा जीव वाचला आहे

कल्याण रेल्वे स्थानकात आरपीएफ जवानाने दाखलवेल्या सतर्कतेमुळे एका गर्भवती महिलेचा जीव वाचला आहे. जवानाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एक मोठी दुर्घटना टळली. चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करणारी महिला ट्रेनखाली जाणार इतक्यात जवानाने धाव घेत महिलेचा जीव वाचवला. रेल्वे स्थानकावरील ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

सोमवारी कल्याण रेल्वे स्थानकात ही घटना घडली. सीसीटीव्हीत दिसत आहे त्याप्रमाणे एक्स्प्रेस फलाटावर थांबली होती. यावेळी आरपीएफ कॉन्स्टेबल एस आर खांडेकर तिथेच उभे होते. एक्स्प्रेस सुरु झाल्यानंतर महिला चुकीच्या पद्धतीने उतरत असल्याचं लक्षात येता खांडेकर यांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान महिला तोल जाऊन खाली पडली असता खांडेकर यांनी तिला तात्काळ बाजूला खेचत ट्रेनखाली जाण्यापासून वाचवलं.

ही महिला गर्भवती होती. खांडेकर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे महिलेसह तिच्या बाळालाही जीवनदान मिळालं,

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rpf constable saves pregant woman from slipping under train at kalyan station sgy

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली