डोंबिवली : संघर्ष करून भारतीय मजदूर संघाचे संस्थापक, द्रष्टे विचारवंत दत्तोपंत ठेंगडी यांनी राष्ट्र, मानवता, मानवी समाजाचा उन्नतीसाठी कार्य केले. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने राष्ट्रऋषी होते, अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी ज्येष्ठ विचारवंत दत्तोपंत ठेंगडी यांच्या कार्याचा गौरव केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भारतीय मजदूर संघ ठाणे जिल्हा व ठेंगडी जन्मशताब्दी समितीतर्फे  ‘दत्तोपंत ठेंगडी-द्रष्टा विचारवंत’ ग्रंथाचे प्रकाशन टिळकनगरमधील पेंढरकर सभागृहात करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. प्राचार्य श्याम अत्रे यांनी ग्रंथाचे संपादन केले आहे. संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा. अनिरुद्ध देशपांडे, मजदूर संघाचे माजी अध्यक्ष सी. के. सजीनारायण, कल्याण जिल्हा संघचालक डॉ. विवेक मोडक, जन्मशताब्दी समितीचे मधुकर चक्रदेव, अ‍ॅड. अनिल ढुमणे या वेळी उपस्थित होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss leader dattatreya hosbale praises the work of dattopant thengadi zws
First published on: 17-10-2021 at 03:36 IST