ठाणे: नागपूर खंडपीठाने आरटीई १ किमी अंतराच्या नियमाला स्थगिती दिल्यामुळे पालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतू ज्या पालकांनी आधीच अर्ज भरले आहे, त्यांना पुन्हा नव्याने अर्ज भरण्याची संधी मिळेल का? किंवा सुधारित अर्ज समाविष्ट करता येईल का असे प्रश्न
पालकांसमोर निर्माण झाले आहेत. त्यात,अर्ज भरण्यासाठी १० मार्च ही शेवटची मुदत होती. ही मुदत वाढविण्याबाबत संकेतस्थळावर कोणतिही सुचना देण्यात आलेली नाही, त्यामुळे नव्या नियमावलीला स्थगिती मिळाली असली तरी त्याची अंमलबजावणी कशी होणार याबाबत पालकांमध्ये संभ्रम आहे.
शिक्षण हक्क कायदा (आरटीई) प्रवेश प्रक्रियेला १७ फेब्रुवारी पासून सुरुवात झाली. १० मार्च पर्यंत पालकांना अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यानुसार, राज्यभरात १ लाखाच्या आसपास आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज दाखल आहेत. तर, ठाणे जिल्ह्यातून १९ हजाराच्या आसपास अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक शहरी भागाती विद्यार्थ्यांच्या अर्जाचा समावेश आहे.
आरटीई कायद्यात यंदाच्या वर्षी ३ किमी ऐवजी १ किमी अंतराच्या आतील शाळा निवडाव्या अशी नवीन नियम घालण्यात आला होता. या नव्या नियमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आरटीई प्रक्रियेपासून वंचित राहावे लागत होते. तर, शहरी भागातील विद्यार्थ्यांनाही शाळा निवडताना अडचन निर्माण होत होती. त्यामुळे या नव्या नियमावलीचा सर्वच स्तरातून विरोध होत होता.
अखेर नागपूर खंडपीठाने आरटीई १ किमी अंतराच्या नियमाला स्थगिती दिल्यामुळे पालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतू असे असले तरी, या नविन नियमावलीची अंमलबजावणी नेमकी कशी होईल याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. आधी ज्या पालकांनी आरटीईचे अर्ज दाखल केले आहेत त्या अर्जात बदल कसे करात येतील की, नव्या अर्ज भरावे लागतील असा प्रश्न आता पालकांसमोर निर्माण झाला आहे.
नागपूर खंडपीठाने आरटीई १ किमी नियम अटीला स्थगिती देऊन पालकांना दिलासा देणारा निर्णय घेतला. परंतु, ज्यांनी आधीच अर्ज भरला आहे त्या पालकांमध्ये सुधारित अर्ज पाठवायचा की, पुन्हा नव्याने अर्ज भरायचा का ? तसेच आरटीई अर्ज भरण्याची १० मार्च पर्यंत मुदत देण्यात आली होती आता ही मुदत वाढवणार का या बाबत कोणतेही अपडेट आरटीई अधिकृत संकेतस्थळावर अद्याप अपडेट झालेले नसल्यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. – प्रकाश दिलपाक, शिक्षण आरोग्य अधिकार मंच
