ठाणे : जपान येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी चमकदार कामगिरी करणाऱ्या मराठमोळ्या विशेषत: ठाणेकर असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू रुद्रांक्ष पाटील यांचे ठाण्यात जंगी स्वागत करण्यात आले. रुद्रांक्ष यांच्या स्वागतासाठी अनेक विद्यार्थी, क्रीडा प्रेमी जमले होते.
ठाणे शहरात राहणारा रुद्रांक्ष पाटील हा भारतीय नेमबाजपटू आहे. अथक परिश्रमाच्या जोरावर त्याने ऐतिहासिक कामगिरी करत देशाला अनेक पदके मिळवून दिली आहेत. जपान येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत संघाला दोन रौप्यपदके मिळवून दिली, तर वैयक्तिक प्रकारात कांस्यपदक पटकावले. या कामगिरीनंतर ठाण्यात रुद्रांक्ष यांचे जंगी स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी पूर्व द्रूतगती महामार्गावर क्रीडाप्रेमी, विद्यार्थी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
रुद्रांक्ष यांचे अथक परिश्रम
- रुद्रांक्ष हा ठाण्याचे परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील आणि ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकारी हेमांगिनी पाटील यांचा पूत्र आहे. रुद्रांक्ष यांचे आई-वडिल, प्रशिक्षक अजित पाटील, स्नेहल कदम, दिवंगत डाॅ. आनंद नाडकर्णी यांचा त्यांच्या आतापर्यंतच्या यशामध्ये महत्त्वाचा वाटा आहे. त्याला ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सूवर्ण पदक मिळवून देण्याचे स्वप्न आहे. रुद्रांक्ष हे दररोज सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सराव करत. त्यानंतर पुन्हा सायंकाळी ५ वाजता पवईला फिजिओथेरपीसाठी जात असे. रात्री घरी परतण्याची वेळ नसते. अथक परिश्रम केल्याने ते येथपर्यंत पोहचू शकले. त्यांची आई हेमांगिनी यांनीही यासाठी मेहनत घेतली.
अपघाताने नेमबाजपटू
- २०१४ मध्ये मेजर गावंड यांच्या द्रोणाचार्य शुटींग रेंजचे उद्घाटन होते. या उद्घाटनाप्रसंगी तेथील प्रशिक्षक स्नेहल कदम यांनी रुद्रांक्ष यांनाही प्रशिक्षणाला पाठविण्याची विनंती बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली होती.
रुद्रांक्ष यांना फुटबाॅल आणि स्केटिंगमध्ये आवड होती. परंतु वडिल बाळासाहेब यांनी सांगितल्याने ते प्रशिक्षणासाठी जात राहिले. २०१४ मध्ये जिल्हा, शाळास्तरिय स्पर्धेत त्याची कामगिरी उंचावू लागली होती. तसेच पदके मिळू लागल्याने शाळेत सत्कार होत होता. हे सर्व अनुभवल्यानंतर रुद्रांक्ष यांना यामध्ये रूची निर्माण झाली होती. त्यानंतर
