ठाणे : नवी मुंबई येथील न्यू हॉरीझॉन पब्लिक स्कूल या शाळेच्या बसला प्रवासादरम्यान शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी तीन हात नाका येथे घडली. या बसमध्ये पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांसह एकूण १८ जण होते. मात्र, वाहतूक पोलिसांनी त्यांना वेळीच बाहेर काढल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नवी मुंबई येथील ऐरोली भागात न्यू हॉरीझॉन पब्लिक स्कूल आहे. या शाळेची बस विद्यार्थ्यांना घेऊन ठाण्याहून नवी मुंबईच्या दिशेने जात होती. त्यावेळी बसगाडीमध्ये पहिली ते तिसरीच्या वर्गात शिकणारे एकूण १६ विद्यार्थी आणि वाहनचालक, त्याचा मदतनीस असे एकूण १८ जण होते. ही बस तीन हात नाका येथे आली असता बसमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे बसमधून धूर येऊ लागला. तीन हात नाका भागात ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी कर्तव्यावर होते. बसमध्ये धूर येत असल्याचे लक्षात येताच वाहनचालकाने बस थांबवली. काही कळायच्या आत धूर वाढू लागल्याने बसमधील कर्मचारी आणि मुलांनी आरडाओरडा सुरू केला. यावेळी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी वेगाने हालचाली करत बसमध्ये बसलेल्या सर्वाना बाहेर काढले. तसेच बस रस्त्याच्या बाजूला केली. पोलिसांनी तात्काळ ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करून आग विजवली. ही आग किरकोळ स्वरूपातील होती. परंतु आगीचा भडका उडण्यापूर्वीच पोलिसांनी प्रसंगावधान दाखविल्याने पुढील अनर्थ टळला.
शालेय बसच्या तपासणीसाठी विशेष मोहीम
मुंबई : करोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यापासून शाळा नियमितपणे सुरू होत असताना शालेय बसमधून विद्यार्थी वाहतूकही सुरळीत होत आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने शालेय बसच्या तपासणीची विशेष मोहीम हाती घेतली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीकरिता वापरण्यात येणाऱ्या वाहनांना पिवळा रंग दिला आहे का , बसमध्ये प्रथमोपचार पेटी आणि अग्निशामक साधने ठेवणे आवश्यक आहे, वाहनचालकाकडे पाच वर्षे वाहन चालवण्याचा अनुभव असावा, बसमध्ये विद्यार्थ्यांसाठी मदतनीस यासह अन्य नियमांची अंमलबजावणी होते की नाही हेही तपासण्यात येणार आहे. यात त्रुटी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. यासाठी वाहतूक पोलिसांचीही मदत घ्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

Navi Mumbai, Escalating Traffic, traffic jam, airoli, belapur, Illegal Parking, traffic jam in Navi Mumbai, traffic jam belapur, traffic jam airoli, illegal parking in navi mumbai, marath news, two wheelar parking, four wheelar parking, navi mumbai citizens,
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत वाहनतळांची सुविधा अपुरी
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
high court ask Questions to bmc and sent notice over Tragic Deaths of children in Wadala
दोन मुलांच्या मृत्यूचे प्रकरण: मुंबईत मानवी जिवाची किंमत काय? उच्च न्यायालयाचा महापालिकेला प्रश्न
mumbai, malad, Malvani, Three Youths, Fall into Drain, Two Declared Dead, Tragic Incident,
मुंबई : मालाड येथील मालवणीमध्ये तिघे गटारात कोसळले; दोघांचा मृत्यू