डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेतील सर्वाधिक वर्दळीच्या पंडित दिनदयाळ रस्त्यावरील सम्राट हॉटेल चौक येथे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे फाऊंडेशनतर्फे दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. या उत्सवासाठी मंडप उभारणीचे काम सम्राट चौकात करण्यात येणार आहे. यासाठी मंगळवारी रात्री १२  पासून ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत डोंबिवली रेल्वे स्थानकाकडून सम्राट चौकाकडे येणारी आणि सम्राट चौकाकडून रेल्वे स्थानकाकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचा निर्णय डोंबिवली वाहतूक विभागाने घेतला आहे.

पं. दिनदयाळ रस्त्यावरील सम्राट चौकातील व्यंकटेशन दर्शन सोसायटी येथे भव्य व्यासपीठ दहीहंडी उत्सवासाठी माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे फाऊंडेशनतर्फे उभारण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवली पालिकेने मंडप उभारणीसाठी परवानगी दिली आहे. या उत्सवात गोिवदा पथके अधिक संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांना त्रास होण्याची शक्यता विचारात घेऊन सम्राट चौकाकडे जाणारी वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत. या मंडप उभारणीला पालिकेने परवानगी दिली आहे, असे डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Pune-Daund suburban service,
रेल्वे प्रवाशांचा मतदानावर बहिष्कार! पुणे-दौंड उपनगरी सेवा सुरू होत नसल्याने पाऊल
heavy vehicles ban on Mumbai Pune Expressway for three days
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर तीन दिवस अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

पर्यायी रस्ता : डोंबिवली रेल्वे स्थानकाकडून पं. दिनदयाळ रस्त्याने सम्राट चौकाकडे जाणारी वाहतूक सर्व प्रकारच्या वाहनांना गणपती मंदिर येथे बंद करण्यात येणार आहे. ही वाहने गणपती मंदिर येथे डावे वळण घेऊन जी. एन. गॅरेज, येलोरा सोसायटी मार्गावरुन इच्छित स्थळी जातील. देवीचापाडा, सत्यवान चौक, ठाकुरवाडी, रेतीबंदर, आनंदनगर, दिनदयाळ रस्त्याने सम्राट चौकातून थेट डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांना सम्राट चौक येथे रस्ता बंद करण्यात येणार आहे. ही वाहने सम्राट चौक येथे डावे वळण घेऊन नाना शंकर शेठ मार्गे घनश्याम गुप्ते रस्ता मार्गे जातील.