लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ठाणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविषयी टीका करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यापाऱ्यांचा चुकीचा उल्लेख केल्याबद्दल ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन (टिसा) या लघु उद्योजकांच्या संघटनेने नाराजी व्यक्त करत त्यांचा निषेध केला. राऊत यांनी वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी देखील संघटनेने केली आहे.
एखाद दुसरा व्यापारी चोरी करत असेल तर सर्व व्यापाऱ्यांना सरसकट चोर म्हणणे चुकीचे आहे. व्यापारी भेसळखोर असतात आणि व्यापारी नेहमी खोटे बोलतो अशा प्रकारे चोर म्हणून त्यांची प्रतारणा करणे नुसते अयोग्य नसून तर हा संपूर्ण व्यापारी जगताचा हा अपमान करणारे आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे. व्यापाऱ्यांची वेळोवेळी सर्वच पक्षांना मदत होत असते. देशाच्या, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये देखील ते हातभार लावतात. इतकेच नव्हे तर रोजगार उपलब्धतेमध्ये देखील त्यांचा फार मोठा वाटा आहे. त्यामुळे टिसातर्फे आम्ही संजय राऊत यांचा जाहीर निषेध करतो असे संघटनेने स्पष्ट केले.
आणखी वाचा-“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
तसेच या विषयीचा ठराव नुकत्याच पार पडलेल्या कार्यकारी समिती सभेत करण्यात आल्याचेही संघटनेने सांगितले. आमचा राजकारणाशी काही संबंध नसून सर्वच राजकीय पक्षांशी आमचे संबध येतात आणि वेळोवेळी सहकार्य होते. संजय राऊत यांनी व्यापारी वर्गाप्रती दिलगिरी व्यक्त करावी व त्यांनी केलेले वाक्य मागे घ्यावे अशी मागणी देखील संघटनेने केली आहे.