अंबरनाथ : आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी पार पडली. अंबरनाथच्या एकूण २८ ग्रामपंचायतींपैकी ३ ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी, २ अनुसूचित जातीसाठी तर ८ जागा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत. तर १५ ग्रामपंचायतींचे सरपंचपद खुले असणार आहे. त्यातील ८ जागा महिलांसाठी आरक्षित असेल. मुरबाड तालुक्यातील १२६ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर झाले असून अनुसूचित क्षेत्रातील ५५ तर बिगर अनुसूचित क्षेत्रातील ७१ ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे. या आरक्षण पदाच्या सोडतीनंतर आता ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी अनेकांनी तयारी सुरू केली आहे तर अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.

येत्या वर्षात ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यापूर्वी २०२१ मध्ये ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या होत्या. त्यामुळे आता आगामी काळासाठी ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची सोडत काढणे अपेक्षित होते. त्यानुसार अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्यातीची सरपंच पदाची आरक्षण सोडत प्रक्रिया मंगळवारी पार पडली. यात अंबरनाथ तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींच्या तर मुरबाड तालुक्यातील १२६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची सोडत काढण्यात आली. मुरबाड तालुका आदिवासीबहुल तालुका असल्याने येथे अनुसूचित क्षेत्रातील ५५ तर बिगर अनुसूचित क्षेत्रातील ७१ ग्रामपंतायतींचा यात समावेश होता. बिगर अनुसूचित क्षेत्रातील देवगाव आणि न्हावे या ग्रामपंचायती अनुसूचीत जातीसाठी आरक्षित असून न्वाहे महिलांसाठी आरक्षित आहे. तर साकुर्ली, कळंभे या ग्रामपंचायती अनुसूचीत जमातीसाठी तर शिरगाव आणि पोटगाव अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव असतील. तर १९ ग्रामपंचायती या नागरिकांचा मागास प्रवर्गातील सरपंचासाठी आरक्षित असेल. ४६ ग्रामपंचायतींचे सरपंचपद सर्वसाधारण व्यक्तींसाठी खुले असेल. त्याचवेळी अनुसूचीत क्षेत्रातील महिला संरपंचांसाठी २८ ग्रामपंचायतींचे आरक्षण असेल. तर २७ ग्रामपंचायती या सर्वसाधारण व्यक्तींसाठी आरक्षित असतील.

अंबरनाथच्या २८ ग्रामपंचायतींपैकी २ ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी तर ३ गावांचे सरपंचपद अनुसूचीत जमातीसाठी आरक्षित असेल. ८ ग्रामपंचायतींचे सरपंचपद नागरिकांचा मागा प्रवर्गासाठी तर त्यातील चार महिलांसाठी आरक्षित असेल. १५ ग्रामपंतायतींच्या सरपंचपदावर कोणतेही आरक्षण नसेल. त्यातील ८ या महिलांसाठी राखीव असतील.

अंबरनाथ तालुक्यातील सरपंचपदाचे जाहीर आरक्षण

१ बुर्दुल – अनुसूचित जाती (स्त्री)

२ साई – अनुसूचित जाती

३ डोणे- अनुसूचित जमाती (स्त्री)

४ मांगरुळ- अनुसूचित जमाती

५ सागांव- अनुसूचित जमाती

६ गोरेगांव- नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री)

७ वांगणी- नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री)

८ सावरे- नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री)

९ काकोळे-नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री)

१० हाजीमलंगवाडी- नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग

११ चामटोली- नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग

१२ खरड- नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग

१३ मुळगांव- नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग

१४ ढोके-दापीवली सर्वसाधारण (स्त्री)

१५ उसाटणे- सर्वसाधारण (स्त्री)

१६ अस्नोली -सर्वसाधारण (स्त्री)

१७ आंबेशिव बु. -सर्वसाधारण (स्त्री)

१८ काराव- सर्वसाधारण (स्त्री)

१९ दहीवली- सर्वसाधारण (स्त्री)

२० चरगांव- सर्वसाधारण (स्त्री)

२१ नाऱ्हेण- सर्वसाधारण (स्त्री)

२२ नेवाळी- सर्वसाधारण

२३ पोसरी- सर्वसाधारण

२४ कान्होर- सर्वसाधारण

२५ कासगांव- सर्वसाधारण

२६ ढवळे-कुडसावरे – सर्वसाधारण

२७ चोण- सर्वसाधारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२८ रहाटोली- सर्वसाधारण