scorecardresearch

अपुऱ्या एसटी सेवेमुळे ग्रामीण भागात टंचाई; कोकणातील लोंढय़ामुळे ठाणे, पालघरमध्ये वाहतूक विघ्न

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ५०० पेक्षा अधिक बसगाडय़ा गणेशोत्सवानिमित्ताने कोकणात रवाना झाल्याने या दोन्ही जिल्ह्यातील ग्रामीण भागात एसटीवर अवलंबून असणाऱ्या प्रवाशांना ऐन सणासुदीच्या दिवसात गैरसोयीला सामोरे जावे लागले.

st bus , ST service
अपुऱ्या एसटी सेवेमुळे ग्रामीण भागात टंचाई; कोकणातील लोंढय़ामुळे ठाणे, पालघरमध्ये वाहतूक विघ्न ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

ठाणे, पालघर : ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ५०० पेक्षा अधिक बसगाडय़ा गणेशोत्सवानिमित्ताने कोकणात रवाना झाल्याने या दोन्ही जिल्ह्यातील ग्रामीण भागात एसटीवर अवलंबून असणाऱ्या प्रवाशांना ऐन सणासुदीच्या दिवसात गैरसोयीला सामोरे जावे लागले. राज्य परिवहन मंडळाच्या पालघर विभागातील २०१ बसगाडय़ा कोकणात पाठवण्यात आल्या. त्यामुळे जिल्ह्यातील आठ आगारांमधील मध्यम व लांब पल्ल्याच्या किमान ११८ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. ठाणे जिल्ह्यातही मुरबाड, शहापूर, भिवंडी तसेच आसपासच्या गावांमधील एसटीची वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले.

गणेशोत्सवानिमित्ताने ठाणे विभागातून राज्य परिवहन सेवेच्या एक हजार ९६४ बसगाडय़ा कोकणात सोडण्यात आल्या. सर्वाधिक बसगाडय़ा कल्याण-डोंबिवली आणि ठाणे शहरातून होत्या. या सर्व बसगाडय़ा अहमदनगर, धुळे, धाराशीव, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर यासह विविध भागातून ठाण्यातून चालविल्या जात होत्या. ठाण्यातील सुमारे २५० बसगाडय़ा कोकणात वळविण्यात आल्या होत्या. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा फटका बसला. राज्य परिवहन सेवेच्या ठाणे विभागामार्फत एक हजार ९६४ बसगाडय़ांची नोंदणी करण्यात आली आहे. या सर्व बसगाडय़ा अहमदनगर, धुळे, धाराशीव, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, सांगली, कोल्हापूर आणि पुणे भागातून ठाण्यात आणल्या होत्या. यातील १४ सप्टेंबरला एक, १५ सप्टेंबर २७, १६ सप्टेंबर ९६६, १७ सप्टेंबर ८७८ आणि १८ सप्टेंबर ९२ इतक्या गाडय़ा सोडण्यात आल्या. गणेशोत्सवानिमित्ताने इतर भागातून बसगाडय़ा आणल्याने तेथील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. ठाणे विभागातूनही विविध आगारातून सुमारे अडीचशे बसगाडय़ा विविध विभागातून सोडण्यात आल्या होत्या.

Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Sharad Pawar on Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe
शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून वाद, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला काही…”
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का

हेही वाचा >>>कोकणच्या एसटी फेऱ्यांवर शिंदे पितापुत्रांची छाप; ठाणे विभागातून एक हजार बसगाडय़ांची नोंदणी

उत्पन्नापेक्षा तोटाच जास्त

राज्य परिवहन सेवेच्या या आगाऊ नोंदणीचा कोणताही फायदा राज्य परिवहन सेवेला होत नाही. उलट नुकसान होत असल्याचे एसटी महामंडळाच्या काही अधिकाऱ्यांनी सांगितले. बसगाडीची नोंदणी करताना दैनंदिन तिकिटाच्या दरभाडेनुसार तिकीट आकारले जाते. एसटी बसगाडय़ांमध्ये ४२ प्रवाशांसाठी आसन व्यवस्था असते. कोकणात प्रवाशांना सोडल्यानंतर बसगाडी पूर्णपणे रिकामी येते. त्यामुळे इंधन खर्च, वाहतूक कोंडी यामुळे नुकसान होते, असेही त्यांचे म्हणणे आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Scarcity in rural areas due to inadequate st service thane palghar amy

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×