Badlapur Crime News : बदलापूर या ठिकाणी सकाळपासूनच तणावाचं वातावरण आहे. दोन चिमुकल्या मुलींचं लैंगिक शोषण झाल्यामुळे बदलापुरात नागरिकांचा प्रचंड प्रमाणात रोष पाहण्यास मिळाला. बदलापूरमधल्या एका नामांकित शाळेत काम करणाऱ्या एका स्वच्छता कर्मचाऱ्याने दोन लहान मुलींवर लैंगित अत्याचार केले. या प्रकरणी आरोपीला अटक झाली. आता या आरोपीला फाशी देण्याची मागणी करत आंदोलन केलं जातं आहे. जाणून घेऊ या प्रकरणाचा ( Badlapur Crime ) घटनाक्रम

बदलापूर शहर हादरलं

बदलापूरमधली एक नामांकित शाळा. या शाळेत घडलेल्या घटनेमुळेच संपूर्ण शहर हादरलं. शाळेत काम करणाऱ्या सफाई कामगाराने दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार ( Badlapur Crime ) केले. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणात गुन्हा दाखल करुन घेणाऱ्या पोलिसांवर कारवाई झाली आहे.

शाळा प्रशासनाचा माफीनामा

शाळा प्रशासनाने या प्रकरणात माफीनामा सादर केला आहे. पालकांचा उद्रेक झाल्यानंतर या प्रकरणात मुख्याध्यापकांसह चार जणांचं निलंबन करण्यात आलं. माणुसकीला लाज आणणारी घटना समोर आल्यानंतर शेकडो पालक रस्त्यावर उतरल्याचं पाहण्यास मिळालं.

आरोपी २३ वर्षांचा कर्माचारी

या प्रकरणातला आरोपी हा शाळेतला स्वच्छता कर्मचारी आहे. २३ वर्षांच्या या नराधमाने दोन मुलींवर लैंगिक अत्याचार ( Badlapur Crime ) केले. त्यांच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन त्याने हा घृणास्पद ( Badlapur Crime ) प्रकार केला. ही घटना १२ ऑगस्टची असून सकाळचे वर्ग सुरु असताना घडली.

मुलीला काय घडलं ते कळलंही नाही

शाळेतून घरी परतल्यानंतर अल्पवयीन मुलीने तिला त्रास होत असल्याचं सांगितलं. या मुलीला काय घडलं आहे ते कळतही नव्हतं. तिला डॉक्टरांकडे नेल्यानंतर नेमकं काय झालं आहे ते डॉक्टरांनी सांगितलं.

पॉक्सो अंतर्गत आरोपीला अटक

या प्रकरणातल्या आरोपीला पॉक्सो अंतर्गत अटक ( Badlapur Crime ) करण्यात आली. शुक्रवारी रात्री (१६ ऑगस्ट) उशिरा या प्रकरणातला गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा प्राथमिक तपास केल्यानंतर आरोपीला गजाआड करण्यात आलं.

बदलापूरकरांचा रोष

लैंगिक अत्याचार प्रकरणातील ( Badlapur Crime ) आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा दिली जाईल हे आश्वासन दिल्यानंतरही बदलापूरकरांचा रोष कमी झालेला नाही. बदलापूरमध्ये सकाळपासूनच या प्रकरणाच्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

हे पण वाचा- रक्त खवळतंय, हँग द रेपिस्ट; बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी मराठी कलाकारांनी व्यक्त केला संताप, पोस्ट चर्चेत

रेल रोको

बदलापूरमध्ये जनक्षोभ उसळलेला पाहण्यास मिळाला आणि संतप्त नागरिकांनी बदलापूरच्या रुळांवर उतरून रेल्वे सेवा अडवून धरली. तसंच पालकांनी आमच्या मुलींच्या सुरक्षेचं काय हा प्रश्न सातत्याने उपस्थित पोलीस, प्रशासकीय अधिकारी यांना विचारला.

मुख्यमंत्र्यांनी दिलं आश्वासन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन आरोपीवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल हे आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं. तसंच या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवला जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं.

राज्य महिला आयोगाकडून दखल

बदलापूरमध्ये घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण ठाणे जिल्हा हादरला आहे. या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगानेही घेतली आहे. आत्तापर्यंत काय काय तपास झाला त्याचा अहवाल मागवला आहे. तातडीने कारवाई होण्यासाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासनही राज्य महिला आयोगाने दिलं आहे.

बदलापूरमध्ये जी घटन घडली त्याविरोधात पालक आणि नागरिकांचा प्रचंड रोष पाहण्यास मिळाला. (फोटो-ANI)

बदलापूर प्रकरणी एसआयटी स्थापन, देवेंद्र फडणवीसांचे आदेश

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण हे धक्कादायक आहे आणि या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही असा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करुन सदर प्रकरणात कारवाईचे आदेश दिले आहेत.

दिवसभरात काय काय घडलं?

सकाळी ७.३० वाजता शाळेसमोर आंदोलन सुरु झालं.

सकाळी १० वाजता आक्रमक आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको सुरु केला. अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशेच्या लोकल गाड्या अडवून धरल्या.

सकाळी ११.३० वाजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संयम ठेवावा अशी प्रतिक्रिया दिली.

सकाळी ११.३० वाजता सदर गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

दुपारी ११.४५ च्या सुमारास आंदोलकांनी शाळेचं गेट तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला.

दुपारी १२ वाजता आंदोलकांनी शाळेची तोडफोड केली

दुपारी १२.१५ वाजता शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तातडीची पत्रकार परिषद घेतली आणि आत्तापर्यंत जी कारवाई झाली आहे त्याची माहिती दिली.

साधारण १ वाजण्याच्या सुमारास शाळेचे अध्यक्ष जय कोतवाल मीडियासमोर त्यांनी हात जोडून तोडफोड न करण्याची विनंती केली

दुपारी १२. ४० वाजता पोलिसांना रेल्वे ट्रॅक मोकळा केला तेव्हा आंदोलकांनी दगडफेक सुरु केली.

दुपारी १ वाजता आंदोलक पुन्हा एकदा रेल्वे ट्रॅकवर आले.

आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊ नका, बदलापूरच्या चौकात फाशी द्या, आंदोलकांची आग्रही मागणी