scorecardresearch

Premium

ठाणे : सुरक्षारक्षकाला पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

दोन अल्पवयीन मुलींना अश्लील चित्रफीत दाखवून त्यांची लैंगिक छळ करणाऱ्या सुरक्षा रक्षकास ठाणे न्यायालयाने पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

security guard sentenced to five years imprisonment
कोपरी पोलीसांनी लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम कायद्याअंतर्गत चव्हाण याला अटक केली होती.(फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : ठाणे महापालिकेच्या कोपरीतील एका शाळेतील दहावीच्या दोन अल्पवयीन मुलींना अश्लील चित्रफीत दाखवून त्यांची लैंगिक छळ करणारा सुरक्षा रक्षक विकास चव्हाण (३३) याला ठाणे न्यायालयाने पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची तसेच दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

hasan mushrif nana patole
फसवणूक केल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवूनही मुश्रीफ सत्तेत; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका
hema upadhyay murder case, artist chintan upadhyay, adv haresh bhambhani murder case, hema upadhyay double murder case
मी निर्दोष, तरीही शिक्षा स्वीकारण्यास तयार! – उपाध्याय
vijaykumar gavit
क्षमता चाचणीला अनुपस्थित आश्रमशाळा शिक्षकांना अजून एक संधी; पुन्हा गैरहजर राहिल्यास शिस्तभंगाची कारवाई- आदिवासी विकास मंत्र्यांचा इशारा
jail , nagpur, nagpur news, suicide case
हुंड्यासाठी छळ, पत्नीची दोन मुलांसह आत्महत्या; पतीस १० वर्षे कारावासाची शिक्षा

कोपरी येथील एका शाळेमध्ये पिडीत मुली शिकत होत्या. २०१६ मध्ये विकास चव्हाण याने या मुलींना शाळेतील एका खोलीमध्ये नेले. तसेच त्यांना अश्लील चित्रफीत दाखवून त्यांची लैंगिक छळवणूक केली. त्यानंतर मुलींनी त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. या मुलींपैकी एका मुलीने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. आईने ही बाब शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगण्यापूर्वी चव्हाण याने यातील दुसऱ्या मुलीला गाठून हा प्रकार मुख्याध्यापिकेला किंवा पोलिसांना सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती.

आणखी वाचा-कसारा-सीएसएमटी रेल्वे वाहतूक ठप्प, खर्डी रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीच्या इंजिनात बिघाड

दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कोपरी पोलीसांनी लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम कायद्याअंतर्गत चव्हाण याला अटक केली होती. त्यानंतर शाळेतून चव्हाण याला निलंबित केले होते. विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी या खटल्यात ११ साक्षीदार तपासले. सर्व साक्षी पुरावे ग्राहय मानून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. वीरकर यांनी चव्हाण याला ही पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. पोलीस निरीक्षक एम. डी. जाधव यांनी या प्रकरणाचा तपास केला. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार विजय सानप आणि अंमलदार सुशिला डोके यांनी काम पाहिले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Security guard was sentenced to five years rigorous imprisonment mrj

First published on: 26-09-2023 at 13:34 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×