scorecardresearch

सामाजिक बदलांचा लेखकांवर रेटा; डोंबिवलीतील युवा नाट्य संमेलन परिसंवादात ज्येष्ठ नाटककार शेखर ढवळीकर यांनी व्यक्त केले मत

झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाने प्रत्येक गोष्टीतील उत्सुकता, लेखनातील धीरगंभीरता, गुढता, कथानाट्य संपवून टाकले आहे.

सामाजिक बदलांचा लेखकांवर रेटा; डोंबिवलीतील युवा नाट्य संमेलन परिसंवादात ज्येष्ठ नाटककार शेखर ढवळीकर यांनी व्यक्त केले मत
(डोंबिवलीत युवा नाट्य संमेलनात सहभागी झालेले ज्येष्ठ गायिका शुभदा दादरकर, ज्येष्ठ दिग्दर्शक कुमार सोहोनी, ज्येष्ठ नाटककार शेखर ढवळीकर, ज्येष्ठ लेखक आनंद म्हसवेकर, ज्येष्ठ अभिनेते अविनाश नारकर.)

झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाने प्रत्येक गोष्टीतील उत्सुकता, लेखनातील धीरगंभीरता, गुढता, कथानाट्य संपवून टाकले आहे. या बदलत्या परिस्थितीचा आर्थिक फायदा घेत व्यावसायिक यश कसे मिळविता येईल. हा विचार आता पुढे येत आहे. तुमचे लिखाण, कलाकृती गुणवत्ता, विचार खोलीचा आहे का, यापेक्षा समाजमनाला ती पटेल की नाही या बाजारीकरणावर आता लिखाण, कलाकृतीची गुणवत्ता तपासली जात आहे. या बाजारीकरणाचा लेखक, समीक्षकांवर रेटा वाढला आहे, असे मत ज्येष्ठ लेखक आणि नाटककार शेखर ढवळीकर यांनी रविवारी येथे व्यक्त केले.

हेही वाचा >>>भाषा, वैचारिक खोली असेपर्यंत मराठी नाटकांना मरण नाही; डोंबिवलीतील युवा नाट्य संमेलनात संमेलनाध्यक्षा संपदा जोगळेकर यांनी व्यक्त केले मत

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि डोंबिवली शाखेने मराठी युवा नाट्य संमेलनाचे डोंबिवलीत आयोजन केले आहे. यात ‘रंगभूमीची बदलती रुपे’ विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादामध्ये ज्येष्ठ नाटककार आनंद म्हसवेकर, ज्येष्ठ दिग्दर्शक कुमार सोहोनी, ज्येष्ठ अभिनेते अविनाश नारकर, ज्येष्ठ नाटककार शेखर ढवळीकर, ज्येष्ठ गायिका शुभदा दादरकर सहभागी झाले होते.रंगभूमीवर तांत्रिक बदल झाले. पण आर्थिक बदल अजिबात झाले नाहीत. निर्माता कधीच हसतमुख दिसत नाही. शासनाने रंगभूमीला साहाय्य केले पाहिजे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले.यामुळे ७० टक्के प्रेमकथा संपल्या. यापुर्वी संवाद साधने नव्हती. त्यातून प्रेमकथा मग चित्रपट, नाट्य निर्मिती होत होती. हे प्रमाण आता ३० टक्के उरले आहे. सीसीटीव्हीमुळे धीरगंभीरता, गूढकथा संपुष्टात आल्या. ऐतिहासिक दंत, दीर्घकथांना प्रेक्षक पसंती देऊ लागले आहेत, असे लेखक ढवळीकर यांनी सांगितले.

हेही वाचा >>>ठाणे: खारेगाव भागातील नाल्यात आढळला मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरु

कुटुंबात पुरुषार्थाचा अधिकार आता स्त्रीकडेही आहे. अलीकडे लिखाण करताना कोणतीही गोष्ट रंगवून चालत नाही. या बदलत्या सामाजिक परिस्थिताचा रेटा लेखकांवर येत आहे. अशा बाजुने लिखाण झाले तर त्याला पुढे नेणारा व्यावसायिक मिळतो. अन्यथा ती कलाकृती मागे पडते. विचार आणि कलाकृती काय गुणवत्तेची आहे, यापेक्षा ती बाजारीकरणाच्या अर्थकारणात किती टिकेल याकडे पाहू जाऊ लागले. असे व्यावसायिक यश गुणवत्तेची कसोटी होऊ पाहत आहे. त्याला प्रतिष्ठा मिळत आहे, अशी खंत ढवळीकर यांनी व्यक्त केली.सिनेमातील कास्टिंग आवडले नाही म्हणून राजकारणी ते बदलण्यास भाग पाडत असेल. मावळा आवडला नाही म्हणून तो बदलण्यास सांगत आहे. हे गंभीर आहे असे ते म्हणाले. यापुर्वी समीक्षकांच्या लिखाणावर कलाकृतीचे यशापयश अवलंबून असे. आता समीक्षक म्हणून दडपणामुळे गुडीगुडी लिहून कोणत्याही वादात पडत नाहीत, असे ढवळीकर म्हणाले. यासाठी त्यांनी नोबेल पुरस्कार विजेत्या अमेरिकन लेखक साईन बेग यांचे उदाहरण दिले. बेग यांना अमेरिकेत कोणाही सामान्याने ओळखले नाही. अखेर त्याने एक नवख्या तरुणाला लेखक होण्यापेक्षा कामागार हो असे सांगितले. कोऱ्या कागदाची सकाळीच मला हाक येते म्हणून इकडे वळलो असे बेग यांनी नवख्याला सांगितले होते. तशी आता लेखकांची अवस्था झाली आहे, असे ढवळीकर यांनी सांगितले.

हेही वाचा >>>‘गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करा’; ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

तरुणांनी आज्ञाधारक रहावे. कोणताही शिक्का लावून घेऊ नये. वेळेचा सदुपयोग क्षणाक्षणाला केला तर यश नक्की आहे, असा सल्ला अभिनेते नारकर यांनी दिला. नाटक बघा ती जिवंत रंगभूमी आहे, असे सोहोनी यांनी सांगितले. शुभदा दादरकर यांनी संगीत रंगभूमीचा आढावा घेतला. म्हसवेकर यांनी तरुणांनी झटपट प्रसिध्दीच्या मागे न लागता अनुभवातून पुढे जावे असा सल्ला दिला.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 19:13 IST

संबंधित बातम्या