अल्पवयीन मुलीचे ३० जणांकडून लैंगिक शोषण

पीडितेच्या प्रियकराने लैंगिक संबंधांची चित्रफीत तयार करून पीडितेला धमकावले आणि तिला आपल्या मित्रांशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.

डोंबिवलीतील घटना : सहा महिने अत्याचार; २६ अटकेत

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील सागाव येथे एका अल्पवयीन मुलीवर (वय १४) ३० जणांनी सहा महिन्यांहून अधिक काळ लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे उपनगरांमधील सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाणारे डोंबिवली हादरले आहे.

या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी भोपर आणि सागाव भागातून २६ आरोपींना अटक केली.

पीडितेच्या प्रियकराने लैंगिक संबंधांची चित्रफीत तयार करून पीडितेला धमकावले आणि तिला आपल्या मित्रांशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. हा प्रकार गेले सहा महिने सुरू होता. नांदिवली टेकडी, देसलेपाडा, रबाळे नवी मुंबई, मुरबाड येथील शेतघर, कोळे-बदलापूर रस्ता सर्कल अशा भागांत नेऊन पीडितेचा प्रियकर आणि त्याच्या मित्रांनी हे दुष्कृत्य केले. हा सगळा प्रकार असह्य झाल्याने बुधवारी रात्री पीडितेने पोलीस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीवरून ३० जणांविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 आरोपींना अमली पदार्थांचे व्यसन आहे, अशी सागाव भागात चर्चा आहे. या आरोपींची चौकशी पोलिसांनी सुरू केली. फरार आरोपींचा शोध पोलिसांची विशेष पथके घेत आहेत. विविध वयोगटांतील स्थानिक, परप्रांतीय तरुण या गुन्ह्यात आरोपी आहेत, असे पोलिसांनी सांगितले. दोन वर्षापूर्वी भोपर गाव परिसरात असाच प्रकार उघडकीस आला होता.

गुन्हा दाखल…

३० आरोपींवर बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने (पॉक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका रात्रीत तपास पथके तयार करून या प्रकरणातील २२ आरोपींना अटक केली.

घडले काय?

’डोंबिवली पूर्वेत राहणाऱ्या पीडित मुलीचे या भागातील एका तरुणाशी काही महिन्यापांसून प्रेमसंबंध होते.

’त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्याची चित्रफीत तयार केली. त्याआधारे तो बदनामीची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करीत असे.

’या चित्रफितीचा आधार घेऊन त्याने पीडितेला आपल्या मित्रांशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sexual abuse of a minor girl by 30 people incidents in dombivli akp

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी