scorecardresearch

डाॅ. प्रकाश खांडगे यांना शाहीर कृष्णराव साबळे पुरस्कार; डोंबिवलीत पुरस्कार वितरण सोहळा

८ ऑक्टोबर रोजी ठाकुर्ली पुलाजवळील ब्लाॅसम इंटरनॅशनल शाळेच्या सभागृहात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम सायंकाळी सात वाजता होणार आहे.

Shahir Padmashri Krishna Rao Sable Award Dr. Prakash Khandge Award distribution ceremony Dombivli
डाॅ. प्रकाश खांडगे यांना शाहीर कृष्णराव साबळे पुरस्कार; डोंबिवलीत पुरस्कार वितरण सोहळा (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: येथील यशराज कला मंचतर्फे लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डाॅ. प्रकाश खांडगे यांना शाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ८ ऑक्टोबर रोजी ठाकुर्ली पुलाजवळील ब्लाॅसम इंटरनॅशनल शाळेच्या सभागृहात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम सायंकाळी सात वाजता होणार आहे.

dombivli nagari sahakari bank received maharashtra bank federation best bank award zws
डोंबिवली नागरी सहकारी बँकेला महाराष्ट्र बँक्स फेडरेशनचा ‘सर्वोत्कृष्ट बँक ’ पुरस्कार
Anandwan Bijotsav
चंद्रपूर : आनंदवनात तीन दिवसीय ‘आनंदवन बिजोत्सव’; शेती, मातीवर चर्चासत्रे व मार्गदर्शन
Article On Shabana
शबाना आझमी : समांतर सिनेमांची ‘गॉडमदर!’
Centre announces top national science prize for young talent
लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्काराचे विजेते डॉ. अपूर्व खरे भटनागर पुरस्काराने सन्मानित

यशराज कला मंचचे संस्थापक अध्यक्ष विवेक ताम्हनकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली. या कार्यक्रमात डोंबिवली जिमखान्याचे विश्वस्त आणि ज्येष्ठ संघ स्वयंसेवक मधुकर चक्रदेव यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील लोककलांचा अभ्यास, प्रचार-प्रसार करण्यात, रुजविण्यात प्रा. खांडगे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला, असे ताम्हनकर यांनी सांगितले.

हेही वाचा… गंजलेल्या विजेच्या खांबामुळे दुर्घटनेची शक्यता; डोंबिवली एमआयडीसीतील प्रकार

या पुरस्कार वितरण कार्यक्रमापूर्वी यशराज कला मंचतर्फे लोककलांच्या नृत्यांचे सादरीकरण केले जाणार आहे. यापूर्वी डाॅ. खांडगे यांना संगीत नाटक अकादमी, डाॅक्टर कोमल कोठारी पुरस्कार, शिवनेरी भूषण पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shahir padmashri krishna rao sable award to dr prakash khandge award distribution ceremony at dombivli dvr

First published on: 03-10-2023 at 16:33 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×