शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास २५ टक्के जादा परतावा मिळेल असे सांगून एका भामट्याने वागळे इस्टेट भागातील एका व्यवसायिकाची ४० लाख रुपयांना फसवणूक केली आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

वागळे इस्टेट येथील समतानगर परिसरात व्यवसायिक राहतो. काही महिन्यांपूर्वी त्याने एका समाजमाध्यमावर जाहिरात पाहिली होती. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास २५ टक्के जादा परतावा मिळेल असे त्या जाहिरातीमध्ये लिहीले होते. तसेच एक मोबाईल क्रमांकही त्यामध्ये देण्यात आला होता.

Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
Young Woman, Dream of Joining, Police Force, False Theft Accusation, Forced into Prostitution, Dashed, police, nagpur, nagpur news, marathi news,
पोलिस खात्यात नोकरीसाठी, निवड, पण तिच्या नशिबी वेगळेच काही होते
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”

व्यवसायिकाने तात्काळ संबंधित मोबाईल क्रमांकवर संपर्क साधून गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली. जानेवारी महिन्यात व्यवसायिकाने संबंधित व्यक्तिच्या खात्यावर ४० लाख रुपये जमा केले. दाेन महिने उलटत असतानाही त्यांना परतावा मिळाला नव्हता. त्यानंतर व्यवसायिकाने त्या व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावरही संपर्क साधला. पण त्या व्यक्तीने त्याचा मोबाईल क्रमांक बंंद केला होता.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यवसायिकाने वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.