लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : मिरा भाईंदरचे काँग्रेसचे उमेदवार मुझफ्फर हुसेन आहेत. त्यांनी भगवे फेटे शिवले आहेत. ते गळ्यात भगवे उपरणे घालून फिरू लागले आहेत. त्यामुळे तुम्हाला देखील संधी आहे. कळव्यात आल्यावर ‘जय श्री राम’ बोलायला सुरूवात करा असा सल्ला शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार प्रताप सरनाईक यांनी कळवा मुंब्रा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) उमेदवार नजीब मुल्ला यांना महायुतीच्या मेळाव्यात दिला.

Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

ठाण्यातील ठाणे शहर, कोपरी पाचपाखाडी, ओवळा माजिवडा आणि कळवा मुंब्रा मतदारसंघासाठी महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित नेत्यांनी ठाण्यातील महायुतीचे उमदवार एकत्रित विजयी करायले हवेत असे सांगितले. यावेळी प्रताप सरनाईक यांनी मुल्ला यांना उद्देशून ‘जय श्री राम’ बोलयचा सल्ला दिल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या.

आणखी वाचा-भाजप तुष्टीकरणविना न्याय देते तर विरोधक समाजात वादंग निर्माण करतात, माजी केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंग यांचा दावा

यावेळी प्रताप सरनाईक म्हणाले की, मिरा भाईंदरचे काँग्रेसचे उमेदवार मुझफ्फर हुसेन आहेत. त्यांनी भगवे फेटे शिवले आहेत. ते गळ्यात भगवे उपरणे घालून फिरू लागले आहेत. त्यामुळे नजीब मुल्ला तुम्हाला देखील संधी आहे. कळव्यात आल्यावर ‘जय श्री राम’ बोलायला सुरूवात करा असे सरनाईक म्हणाले.

आम्ही आमदार झालो म्हणून नशीबवान आहोत परंतु भविष्यामध्ये तुमच्यातील काही लोक नगरसेवक, आमदार, खासदार होतील असे कार्यकर्त्यांना उद्देशून सरनाईक म्हणाले. १९९७ मध्ये पहिल्यांदा एकनाथ शिंदे, मी आणि रविंद्र फाटक महापालिका सभागृहामध्ये एकत्रितपणे गेलो. एकनाथ शिंदे यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यांचा स्वभाव शांत होता. कोणाशी जास्त बोलायचे नाही. फक्त दिवंगत आनंद दिघे यांचा आदेश आला की जिल्ह्याचा दौरा करून जे जे काही करता येईल ते संघटनेसाठी करत होते आणि संघटनेचा कार्यकर्ता म्हणून काम करत होते. एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री झाले. नगर विकास मंत्री झाले आणि सव्वा दोन वर्षापूर्वी म्हणजे २७ महिन्यापूर्वी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. नायक चित्रपटातील १० अनिल कपूर देखील कमी पडतील अशा स्वरूपाचे शिंदे यांनी काम केले आहे असेही सरनाईक म्हणाले.

Story img Loader