"अशोक चव्हाणांचा 'आदर्श' सर्वांना माहिती आहे"; फडणवीस सरकार पाडण्याच्या चव्हाणांच्या आरोपावर नरेश म्हस्के यांची टीका |shinde group spokeperson naresh mhaske criticism of ashok chavan allegation of bringing down the Fadnavis government ambadas danve thane | Loksatta

“अशोक चव्हाणांचा ‘आदर्श’ सर्वांना माहिती आहे”; फडणवीस सरकार पाडण्याच्या चव्हाणांच्या आरोपावर नरेश म्हस्के यांची टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेहरबानीने अंबादास दानवे विधानपरिषदेवर निवडून आले आहेत. त्यांना निमंत्रण नसताना ते देवीच्या दर्शनाला आले. तरी आम्ही त्यांचे स्वागत केले असे नरेश म्हस्के म्हणाले.

“अशोक चव्हाणांचा ‘आदर्श’ सर्वांना माहिती आहे”; फडणवीस सरकार पाडण्याच्या चव्हाणांच्या आरोपावर नरेश म्हस्के यांची टीका
"अशोक चव्हाणांचा 'आदर्श' सर्वांना माहिती आहे"; फडणवीस सरकार पाडण्याच्या चव्हाणांच्या आरोपावर नरेश म्हस्के यांची टीका

ठाणे : २०१४ मध्ये शिवसेनेकडून काँग्रेसकडे सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव आला होता, त्यावेळी शिवसनेच्या शिष्टमंडळात एकनाथ शिंद देखील उपस्थित होते, असा मोठा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी नुकताच केला होता. यावर पत्रकार परिषदमध्ये नरेश म्हस्के यांनी अशोक चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली आहे. “अशोक चव्हाण यांचा आदर्श सर्वाना माहिती आहे. अशोक चव्हाण यांच्या पक्षांतराबाबत सर्वत्र बातम्या पसरत आहेत. त्यामुळे त्यांच्या भोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या भोवतीचे संशयाचे वातावरण दूर करण्यासाठी अशोक चव्हाण अशा पद्धतीचे वक्त्यव्य करत आहे” असे म्हस्के म्हणाले.

दरम्यान विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी रात्री उशिरा ठाण्यातील टेंभी नाका येथील देवीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी देवीकडे काय मागणे मागितले असे पत्रकारांनी विचारले असता आपण देवीला ४० महिषासूरांचा नायनाट कर असे मागणे मागितले असल्याचे दानवे म्हणाले होते.

हेही वाचा : फडणवीस सरकारच्या काळात शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदेंचा काँग्रेस-राष्ट्रवादीकडे सरकारचा प्रस्ताव; अशोक चव्हाण यांच्या विधानामुळे शिंदेंची कोंडी

याबाबत नरेश म्हस्के यांनी दानवे यांचा समाचार घेत टीका केली आहे.” अंबादास दानवे कोण आहेत? त्यांची योग्यता काय आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेहरबानीने ते विधान परिषदेवर निवडून आले आहेत. इतके वर्ष त्यांना टेंभी नाक्यावरील नवरात्रउत्सव दिसला नाही. दानवे यांना उत्सवासाठी येण्याचे कुठल्याही प्रकारचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. तरी ते दर्शनाला आले. त्या बाबत आमची कोणतीही हरकत नाही. मात्र त्यांनी इथे येऊन राजकारण केले. त्यामुळे ते केवळ संधी साधू आहेत” अशी प्रतिक्रिया म्हस्के यांनी दिली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
कल्याण मधील मेट्रो माॅल समोर नवी मुंबई परिवहनच्या बसला आग ; जीवित हानी टळली, बस आगीत जळून खाक

संबंधित बातम्या

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतील तुला माहीत आहे ना मी हे करू शकत नाही”, जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट चर्चेत
कल्याण रेल्वे स्थानकाजवळील वाहतूक कोंडीवर उपाय; कल्याण आगारातील बस दुर्गाडी, मुरबाड गणेश घाट येथून सोडण्याचा निर्णय
कल्याण-डोंबिवली पालिकेतील अधिकारी सुनील पाटील निलंबित
उपद्रवी मर्कटाचा दुचाकी, पालिकेची बस आणि एसटीनेही प्रवास
अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात; मनसे कार्यकर्त्यांकडून ‘उद्धव ठाकरे हाय हाय’ची घोषणाबाजी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘संस्काराच्या शिदोरीतील उत्तम गुणदर्शन’! पाकिस्तानच्या रावलपिंडी मैदानात जो रूटने असं काही केलं…; Video होतोय तुफान Viral
VIDEO: चेंडू चमकवण्यासाठी जो रुटने लढवली अजब शक्कल; चक्क! ‘जॅक लीचच्या…’
“संजय राऊतांना पिसाळलेल्या कुत्रा चावला आहे,” शिंदे गटातील आमदाराची सडकून टीका
शिंदे गटाच्या आमदाराकडून शिवीगाळ, संजय राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले, “तिथं ते शेपट्या घालत आहेत आणि…”
“तुमच्यापेक्षा दाक्षिणात्य स्टार्स….” चाहत्याला ढकलल्यामुळे हृतिकवर चाहते संतापले; व्हिडीओ व्हायरल