*मतमोजणी केंद्राबाहेरील वातावरणात जल्लोष
*शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा उत्साह मोठा

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळपासून सुरुवात झाली आणि अपेक्षेप्रमाणे ही लढत शिवसेना आणि भाजप या राज्यातील दोन मित्रपक्षांमध्येच होणार हे काही काळातच स्पष्ट झाले. सुमारे ११८ प्रभागांपैकी जवळपास ८५ पेक्षा अधिक प्रभागांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. शिवसेनेच्या काही बडय़ा नगरसेवकांना धूळ चारत भाजपने सुरुवातीच्या टप्प्यात स्पर्धेत असल्याचे चित्र उभे केले खरे, मात्र दुपारी १२ नंतर निकालाचे चित्र स्पष्ट होताच शिवसेनेने निर्णायक अशी आघाडी घेतली आणि शिवसैनिकांचे जथेच्या जथे कल्याण येथील बाजार समितीच्या परिसरात जमू लागले. या वेळी विजयाच्या आनंदात आक्रमक झालेल्या काही शिवसैनिकांनी भाजप आणि मुख्यमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या. ‘कसली लाट यांचे फोडले कानपाट’ ..‘जबडय़ात घातला हात.. केला स्वतचा घात’, अशा घोषणांनी हा परिसर काही काळ दुमदुमून गेला होता.

ahmednagar lok sabha election 2024 marathi news
नगरमध्ये पवार-विखे पारंपारिक संघर्ष वेगळ्या वळणावर!
२०१९ ते २०२४ मोदींचा मराठवाड्यातील पट पूर्णपणे बदलला !
manipur loksabha election campaign
ना राजकीय सभा, ना पदयात्रा; संघर्षग्रस्त मणिपूरमध्ये कसा होतो आहे प्रचार?
union territories in indian constitution
संविधानभान : राज्यांचा संघ

मतमोजणीसाठी सकाळपासूनच या भागातील वाहतूक बंद होती. मात्र, निकालाचे चित्र स्पष्ट होऊ लागताच शिवसैनिकांचे जथे या ठिकाणी येऊ लागले. टाळ्या, शिट्टय़ा आणि घोषणांनी शिवसैनिकांमधील उत्साह शिगेला पोहोचला होता. या मतमोजणीचे साक्षीदार होण्यासाठी आणि आपल्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी कल्याणच्या आग्रा रोडवर मोठय़ा प्रमाणात गर्दी उसळली होती. मतमोजणी केंद्रासमोरील रस्ता या काळात बंद करण्यात आला होता. त्यामुळे नेहमीच गाडय़ांच्या वर्दळीचा हा भाग विविध पक्षांचे कार्यकर्ते, उमेदवार आणि समर्थकांच्या गर्दीने भरून गेला होता. सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मतमोजणी १० वाजता सुरू होणार असे जाहीर करण्यात आले असले तरी सकाळी ८ वाजल्यापासूनच कार्यकर्ते मोठय़ा संख्यने या भागामध्ये दाखल झाले होते. या भागात खासगी संस्थेच्या वतीने एक मोठा स्क्रीन लावण्यात आला होता. मतमोजणीला सुरुवात झाली, तेव्हा सर्वाची उत्सुकता शिगेला पोहोचली. पहिल्या तीन-चार फे ऱ्यांमध्येच निकालाचा कल शिवसेनेकडे वळू लागताच शिवसैनिकांचा उत्साह शिगेला पोहोचला. महापौर कल्याणी पाटील, सभागृह नेते कैलाश िशदे यांच्या पराभवाचे वृत्त बाहेर येताच शिवसैनिक काही काळ हिरमुसले खरे, मात्र शिवसेनेची वाटचाल उत्तरोत्तर स्पष्ट बहुमताकडे होऊ लागताच पुन्हा शिवसैनिकांनी ढोल-ताशाच्या गजरात जल्लोष सुरू केला.

मनसेत शांतता.. तर एमआयएममध्ये जल्लोष

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत मनसेला गेल्या वर्षीचा करिश्मा यंदा दाखविता आला नाही. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये तशी शांतता दिसून येत होती. महापालिका निवडणुकीत यंदा सात जागा लढविणाऱ्या एमआयएमने एका जागेवर विजय मिळविला. त्यामुळे शिवसेनेच्या पाठोपाठ या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी

मतमोजणी केंद्राबाहेर सकाळपासून मोठी गर्दी उसळली होती. मोबाइलवरील व्हॉट्सअ‍ॅप, टेलिव्हिजन आणि इतर माध्यमांतून निवडणुकांचे माहिती घेताना नागरिक व्यस्त दिसून येत होते. केंद्राबाहेरील कार्यकर्ते केंद्रातील उमेदवार आणि प्रतिनिधींना मोबाइलवर फोन करून अंदाज घेत होते. स्पीकरवरून निकाल सांगितला जात असताना कोणाला किती मते पडली आहेत, हे नागरिक लिहून घेत होते.

पाणीविक्री तेजीत

मतमोजणी केंद्राबाहेर पाणीविक्री तेजीत चालू होती. पाण्याची बाटली काही ठिकाणी २० रुपयांना विकली जात होती. समोसा, कचोरी, पॅटिस यांचे मतमोजणी केंद्राबाहेर स्टॉल लावले होते. परिसरात असणाऱ्या मोबाइल दुकानामध्ये इंटरनेटचे रिचार्ज करण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली होती. उन्हामुळे सावली दिसेल तिकडे गर्दी ओसंडून वाहत होती. या ठिकाणी महिला वर्गाची उपस्थित मोठय़ा प्रमाणात दिसून येत होती.