भगवान मंडलिक

डोंबिवली- कल्याण लोकसभा मतदार संघात काल परवा पर्यंत खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीकेची एकही संधी न सोडणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीण मतदार संघाचे आमदार राजू पाटील यांनी शिंदे सरकारचां विश्वासदर्शक ठराव मंजुरीच्या बाजूने केलेले मतदान ठाणे जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरण ना जन्म देणारे ठरेल अशी शक्यता आहे. या नव्या घडामोडींच्या पश्र्वभुमिवर राजू पाटील आणि खासदार शिंदे यांच्यात दिलजमाई झाल्याचं वृत्त असून मनसेला नव्या मंत्री मंडळात स्थान मिळण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

narendra modi
“जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक होणार, राज्याला लवकरच…”, पंतप्रधान मोदींच्या तीन मोठ्या घोषणा
Dhule District Congress President,
धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्षांचा राजीनामा देण्याचे कारण काय ?
Himachal Pradesh Assembly Elections 2024
हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाची मोठी खेळी, राज्यसभा निवडणुकीत क्रॉस मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या सहा आमदारांना दिली उमेदवारी
Rashmi Barve
नागपूर : उमेदवार ठरवताना काँग्रेसचा ‘ग्रासरुट’ फार्मुला; माजी महापौर, जि.प. अध्यक्षांना संधी

मनसेने राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांना विनाअट केलेली मदत. राज्यातील ठाकरे सरकार उलथवून फुटीर शिंदे यांच्या सहकार्याने शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन करण्यात मनसे आमदार प्रमोद पाटील यांनी घेतलेली युती समर्थनाची भूमिका. मनसेचा आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा. याशिवाय, कल्याण ग्रामीणमध्ये मनसे, शिवसेनेत असलेली धुसफूस कायमची संपुष्टात आणण्यासाठी भाजपने आपल्या मंत्रिपदाच्या कोट्यातून मनसेचे प्रमोद पाटील यांना मंत्रिपद देण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत, अशी माहिती एका उच्चपदस्थ राजकीय सुत्राने दिली.

नवीन शिंदे सरकारचा राष्ट्रवादी, काँग्रेसला शह देणे एवढाच कार्यक्रम असल्याने आता आपल्यात दुही कशासाठी, असा विचार करून भाजप, शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांनी सामोपचाराने काम करून विकास कामांबरोबर आपले राजकीय इप्सित साध्य करू, अशी चर्चा या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ वर्तुळात झाल्याचे विश्वसनीय सुत्राने सांगितले.

आगामी कल्याण डोंबिवली पालिका निवडणुका, विधानसभा, लोकसभा निवडणुकांचा दूरगामी विचार करून भाजप, शिवसेना आणि मनसे नेत्यांनी हा समेटाचा कार्यक्रम आखला असल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर गेल्या १० दिवसात शिवसेना-भाजपचे सूत जुळविण्याचे काम नवी दिल्ली स्तरावरून सुरू होते. शिंदे आता भाजपशी निष्ठेने सरकार स्थापण्यास सज्ज झाले आहेत. हा ‘ओके कार्यक्रम’ झाल्याची पक्की खात्री भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झाल्या नंतर फडणवीस यांनी मनसे नेते राज ठाकरे यांना सरकार स्थापन करण्यासाठी होत असलेल्या घडामोडींची माहिती दिली. अध्यक्ष ठाकरे यांनी विनाअट सेना-भाजपला सत्ता स्थापनेसाठी सहकार्य देण्याचे मान्य केले, असे सुत्राने सांगितले.

मनसेचा एक आमदार असला तरी राज्यातील सत्ता नाट्य, विधान परिषद, राज्यसभा निवडणुकीसाठी मनसे आमदार प्रमोद पाटील यांनी अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेवरून विनाअट, संयमितपणे महत्वाची भूमिका बजावली. राज ठाकरे यांनी एका संपर्कातून फडणवीस यांना दिलेला सकारात्मक प्रतिसाद. हा ‘कनेक्ट’ यापुढील काळात कायम राहावा. सत्ता नाट्यात मनसेचा एक आमदार होता. तरीही मनसेला मंत्रिपद देण्यात आले. हाही संदेश मनसे कार्यकर्त्यांसह जनमानसात जावा हा भविष्यकालीन विचार करून भाजपच्या वरिष्ठांनी भाजप कोट्यातून मनसेला शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद देण्याची जोरदार तयारी चालविली आहे, अशी माहिती उच्चपदस्थाने नाव कधीही बाहेर न येण्याच्या अटीवर दिली. सत्ता स्थापनेतील पडद्यामागील मुख्य सूत्रधार भाजपचे माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कल्याण-शीळफाटा रस्त्यावरील लोढा-पलावातील घरा शेजारीच आ. प्रमोद पाटील यांचा बंगला आहे. त्यामुळे मागच्या दारातून मोठ्या राजकीय हालचाली सुप्तपणे सुरू असल्याचे कळते.

सेना खासदाराला मदत

काही वर्षापासून कल्याण ग्रामीण भागात मनसे आजी, माजी आमदार रमेश पाटील, प्रमोद पाटील आणि शिंदे यांच्या शिवसेनेत राजकीय धुसफूस आहे. पाटील, शिंदे यांच्यात ‘पॅचअप’ करण्यासाठी भाजपने ही खेळी केल्याचे कळते. कल्याण लोकसभा मतदार संघातील कळवा, मुंब्रा परिसर काँग्रेस, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. या भागात शिवसेनेला नेहमीच मतांमध्ये झटका बसतो. ही उणीव भरून काढण्यासाठी कल्याण ग्रामीण मधील नेहमीचा शिवसेनेचा मतदार आणि त्याला मनसेची साथ मिळाली तर कळवा, मुंब्रा भागाची उणीव या भागात भरून हा भाग ‘सेफ’ करायचा. असेही गणित सत्तेच्या सारीपाटातून जुळविले जात असल्याचे सुत्राने सांगितले. भाजपने मध्यस्थी करून स्थानिक गणिते जुळवून आणल्याने मनसे आणि शिवसेनेवर भाजपची नजर राहील. तिन्ही पक्ष आपल्या परिघात काम करून यापूर्वी सारखी मनसे, सेनेत होणारी धुसफूस थांबेल, असाही विचार या नवीन राजकीय गणितांमध्ये करण्यात आला आहे, असे सुत्राने सांगितले. अधिक माहितीसाठी भाजप, मनसे, शिवसेनेच्या काही उच्चपदस्थ नेत्यांना संपर्क केला. त्यांनी खासगीत ‘आता असे घडू शकते,’ अशा सूचक प्रतिक्रिया देऊन अधिक बोलणे टाळले.