भगवान मंडलिक

कल्याण : राज्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये मागील काही महिन्यांपासून स्मार्ट कार्ड, नवीन चालक परवाना दस्तऐवजांचा तुटवडा निर्माण झाला आहे. स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवान्याशिवाय वाहन चालविणे नियमबाह्य असल्याने हे दस्तऐवज घेण्यासाठी राज्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये फेऱ्या माराव्या लागत असल्याची तक्रार वाहन चालक, मालकांनी केली आहे.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
Best Coworking Spaces in Pune
कार्यालयीन जागा सहकार्यात पुणे देशात आघाडीवर
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात

स्मार्ट कार्ड, नोंदणी पुस्तिका (आर. सी. बुक), वाहन चालक परवाना घेण्यासाठी आरटीओमध्ये येणाऱ्यांना वेळकाढू उत्तरे देण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे. मालक आणि कर्मचाऱ्यांच्यामध्ये दररोज खटके उडत आहेत. स्मार्ट सिटी कार्डचा तुटवडा, त्याचा पुरवठा हे विषय परिवहन आयुक्त कार्यालयाच्या अखत्यारितील आहेत. वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे हा प्रश्न निर्माण झाल्याचे स्थानिक आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले असले, तरी ते उघडपणे बोलण्यास मात्र तयार नाहीत. बहुतांश नागरिक स्थानिक मोटार वाहन प्रशिक्षण केंद्रात जाऊन आपली कामे करतात. प्रशिक्षण केंद्रांचे कर्मचारीही वाहन परवान्यासाठी खेटे घालत आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून स्मार्ट कार्डचे वितरण होत नसल्याची माहिती मोटार प्रशिक्षण केंद्राच्या चालकांनी दिली. ‘स्मार्ट कार्डचा कोऱ्या पुठ्ठय़ांचा पुरवठा करणाऱ्या एका खासगी एजन्सीचे कंत्राट काही दिवसापूर्वी संपले. या एजन्सीचे कामाचे देयक परिवहन विभागाकडून अदा करण्यात आले नाही,’ अशी माहिती आरटीओ मधील एका अधिकाऱ्याने दिली.

कारण काय?

स्मार्ट कार्ड, नवीन वाहन चालक परवान्याचे काम करणाऱ्या एजन्सीचे देयक नियमित देणे, त्यांचे कंत्राट संपले असेल तर त्याचे नुतनीकरण करणे किंवा नवीन निविदा मागविणे हे काम परिवहन विभागाचे आहे. ही कामे वेळेत पूर्ण करण्यात आली नाहीत. त्याचा फटका आरटीओ कार्यालयांना बसल्याचे सांगितले जात आहे.

एका पुरवठादाराकडून कोऱ्या कार्डाचा पुरवठा होण्यास विलंब होत आहे. म्हणून हा प्रश्न निर्माण झाला आहे. तो लवकरच मार्गी लागेल.- संदेश चव्हाण, संगणक विभागप्रमुख, परिवहन विभाग, मुंबई</strong>