श्री महावीरनगर सोसायटी,  मानपाडा रस्ता, आयकॉन रुग्णालयासमोर, डोंबिवली पूर्व

देशभरातील इतर महानगरांप्रमाणेच डोंबिवली शहरालाही स्मार्ट होण्याचे वेध लागले आहेत. त्यासाठी महापालिकाही निरनिराळ्या योजना राबवीत आहे. आपले घर, आपली सोसायटी टापटीप ठेवून सर्वसामान्य नागरिकांनाही शहर स्मार्ट करण्यात महत्त्वाचे योगदान देता येऊ शकेल. डोंबिवलीतील श्री महावीरनगर सोसायटीने त्याचा आदर्श वस्तुपाठ रहिवाशांपुढे ठेवला आहे..

Pune, Citizens rewarded, missing school girl,
पुणे : बेपत्ता शाळकरी मुलीची माहिती देणाऱ्या नागरिकांना पोलीस आयुक्तांकडून बक्षीस
sassoon hospital marathi news
ऑपरेशन ‘ससून’! अधिष्ठात्यांना डावलून थेट आयुक्तांनी हाती घेतली सूत्रे
Violation of Right to Information by Regional Psychiatric Hospital in Nagpur
नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयाकडून माहिती अधिकाराचा भंग, सामाजिक कार्यकर्ते म्हणतात…
Young Woman, Dream of Joining, Police Force, False Theft Accusation, Forced into Prostitution, Dashed, police, nagpur, nagpur news, marathi news,
पोलिस खात्यात नोकरीसाठी, निवड, पण तिच्या नशिबी वेगळेच काही होते

साधी, सोपी सूत्रे घेऊन आपण राहत असलेल्या सोसायटीचा कारभार कॉपरेरेट पद्धतीने करू शकतो. सोसायटीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवू शकतो, हे डोंबिवली पूर्व विभागातील मानपाडा रस्त्यावरील आयकॉन रुग्णालयासमोरील श्री महावीरनगर हौसिंग सोसायटीने दाखवून दिले आहे. स्वच्छ, सुंदर, टापटीप आणि चौकटबद्ध कारभारामुळे गेल्या दोन वर्षांत सोसायटीने महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाचे ‘सहकार भूषण’ (२०१३), ‘सहकार निष्ठ’ (२०१७) पुरस्कार पटकावले आहेत. ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशन, कल्याण डोंबिवली पालिका यांनी नगरीला सन्मानित केले आहे. विविध प्रांतांमधून आलेली २६५ बहुधर्मीय कुटुंबे श्री महावीरनगरमध्ये राहतात. या संकुलात चार इमारती आणि बारा पाखे (विंग) आहेत. ३४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे संरक्षक कवच इमारतींना आहे. कागदाचा, कचऱ्याचा तुकडा इथे शोधूनही सापडणार नाही, अशी स्वच्छता सोसायटीच्या आवारात बाराही महिने पाहायला मिळते. पाण्याचे चोख नियोजन असून त्यामुळे संकुलात २४ तास पाणीपुरवठा होतो. आवारात कूपनलिका आहे. भूजल पातळीचे संवर्धन करण्यात येत आहे. घराघरात कूपनलिकेच्या पाण्याची नळ जोडणी दिली की, बेसुमार पाणी उपसा होतो. त्यामुळे कूपनलिकेतून कोणालाही नळजोडणी देण्यात आलेली नाही. ज्या सदस्याला कूपनलिकेचे पाणी पाहिजे त्याने बादली, हंडा घेऊन यावे आणि पाणी घेऊन जावे असा नियम येथे आहे. या कूपनलिकांना चार इमारतींवर पडणारे पावसाचे पाणी सोडण्याचा जलसंचय (रेन वॉटर हार्वेस्टिंग) प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या भागातील नाल्यावर स्लॅब टाकून तेथे उघडय़ावरील जिम तयार करण्याचे काम स्थानिक नगरसेवक महेश पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात येत आहे. सोसायटीत निर्माण होणारा कचरा आवारातच संकलन करून तेथेच विघटित करण्याचा विचार सुरू आहे. श्री महावीरनगर उभे राहून ३२ वर्षे झाली. दणकट, बळकट पद्धतीने इमारतींची उभारणी झाल्याने आणि नियमित स्ट्रक्चरल ऑडिट करून इमारतींची देखभाल दुरुस्ती करण्यात येत असल्याने आजही सोसायटीतील सदनिकांना समोर उभ्या राहणाऱ्या नवीन गृहसंकुलातील सदनिकांपेक्षा अधिक दर आहे.

नगराच्या कोपऱ्यांवर ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी बाकडे बसविण्यात आले आहेत. दररोज सकाळ, संध्याकाळ रहिवासी आवारात शतपावली करतात. नगराच्या प्रवेशद्वारावर प्रशस्त, सोसायटीच्या दस्तऐवजांनी भरलेले वातानुकूलित कार्यालय आहे. त्यात ३२ वर्षांपासूनचा दस्तऐवज जतन करण्यात आला आहे. सीसीटीव्हीचा नियंत्रक कार्यालयात आहे. नोंदणीकरण करून सोसायटीचे मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेअन्स) करण्यात आले आहे.

सोसायटीचा प्रवास

१९८४ला श्री महावीरनगरची उभारणी झाली. या नगराच्या बाजूने एक मोठा नाला गेला आहे. डोंबिवली शहराचे निम्मे पाणी या नगराजवळील नाल्यातून पुढे गांधीनगरच्या दिशेने जात होते. पावसाळा सुरू झाला की रहिवाशांच्या पोटात गोळा यायचा. थोडा पाऊस पडला तरी वस्ती कंबरभर पाण्यात जायची. आजूबाजूला प्रचंड दलदल, रस्ते नाहीत. तीन दशकांपूर्वी अशी परिस्थिती होती. त्यातूनच विकासकाबरोबर संघर्षही झाला होता. सुरुवातीला आजूबाजूच्या सोसायटय़ांचे सहकार्यही नव्हते. अनेक प्रश्नांना रहिवाशांना सामोरे जावे लागत होते. हे प्रश्न सोडविण्यात माणिक देसाईंचे चांगले सहकार्य लाभले. नगरीतील रहिवाशांनी ‘फ्लॅट ओनर्स असोसिएशन’ची स्थापना केली. या कामात सोसायटीच्या सातबारा उताऱ्यापासून ते इमारतींच्या गच्चीपर्यंतची खडानखडा माहिती असलेले तळमळीचे कार्यकर्ते व विद्यमान सचिव के. आर. कांबळे यांच्या ज्ञानाचा सोसायटीला खूप उपयोग झाला.

लेखा परीक्षणात ‘अ’ श्रेणी

इमारतीचा व रहिवाशांचा विमा उतरविण्यात आला आहे. प्रोबेस कंपनी स्फोटात जखमी झालेल्या रहिवाशांना नुकसान भरपाई मिळाली आहे. दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, होळी उत्सव साजरे केले जातात. सार्वजनिक स्नेहभोजनाचा (भंडारा) कार्यक्रम आयोजित केला जातो. गरीब, गरजू मुलांना साहाय्य केले जाते. लेखापरीक्षणात सोसायटी नेहमी ‘अ’ श्रेणीत आहे. नगरीला ‘मिनी भारत’ म्हणून ओळखले जाते.