ठाणे : कल्याण लोकसभेचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे हे अमेरिकेतील ऐतिहासिक ‘बोस्टन’ शहरामध्ये होते. या बोस्टन शहरात आपल्या मराठी उद्योजकांनी चक्क वडापाव विक्रीचा व्यवसाय सुरु केला. हे पाहून श्रीकांत शिंदे यांनी थांबून मित्रांसोबत वडापाव पार्टी केली. १ मे म्हणजेच, महाराष्ट्रदिनी त्यांनी एक चित्रीकरण केले आणि हे चित्रफीत समाजमाध्यमावर शेअर केला. नेमके काय म्हटले श्रीकांत शिंदे पाहूया.

भारतीय पदार्थ त्यातच चविष्ट मिसळ किंवा वडापाव मिळणे म्हणजे भारतीयांसाठी सुखद धक्काच. हा अनुभव खासदार श्रीकांत शिंदे यांना मिळाला. श्रीकांत शिंदे हे अमेरिकेत गेले होते. येथील हार्वर्ड विद्यापीठातील हार्वर्ड केनेडी स्कूलमध्ये ‘सर्वसमावेशक विकासासाठी धोरणात्मक अभ्यासक्रम’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला. याबाबत महाराष्ट्र दिनाच्या दिवशी त्यांना प्रमाणपत्र मिळाले. समावेशक विकास, शाश्वत प्रगती आणि प्रभावी सार्वजनिक धोरण हे या अभ्यासक्रमात होते. त्यानंतर ते अमेरिकेतील ऐतिहासिक बोस्टन शहरात फिरत होते. त्यावेळी त्यांना वडापाव विक्रीचे उपाहारगृह पहायला मिळाले. हा व्यवसाय मुंबईतील मुले करत होती.

तसेच उपहारगृहाचे नाव देखील ‘चटणी’ असे ठेवण्यात आले. अमेरिकेत फिरताना वडापाव खाण्यास मिळत असल्याने श्रीकांत शिंदे यांनाही वडापाव खाण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी दुकानातील मराठी उद्योजकांना भेट दिली. तसेच, त्याचे चित्रफीत फेसबुक या समाजमाध्यमावर प्रसारित केले. अवघ्या ५० सेकंदाच्या या चित्रफीतीत त्यांनी उद्योजकांचे कौतुक केले.

तसेच त्यांच्या उपाहारगृहात बसून वडापावचा आस्वाद घेतला. ही चित्रफीत सध्या समाजमाध्यमावर प्रसारित होत आहे. यावर प्रतिक्रिया देखील उमटत असून चित्रीकरण शेअर केले जात आहे.