‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’

सामाजिक, राजकीय, पर्यावरण आणि क्रीडा अशा विविध विषयांवर अभ्यासपूर्ण आणि परखड मते मांडत ठाण्यातून सहा वक्ते ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’च्या  विभागीय अंतिम फेरीत दाखल झाले. ज्ञानसाधना महाविद्यालयात रविवारी झालेल्या ठाणे विभागीय प्राथमिक फेरीत विद्यार्थी वक्त्यांनी मोठय़ा संख्येने सहभाग नोंदवला.

‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या स्पर्धेने राज्यातील वक्तृत्व स्पर्धामध्ये मानाचे स्थान मिळवले आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयांवर विचारशील आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने वैचारिक मांडणी करण्याची संधी या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना मिळते. यंदा या स्पर्धेचे सहावे पर्व आहे. या स्पर्धेची ठाणे विभागीय प्राथमिक फेरी रविवारी पार पडली. या वेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी ‘निर्भया आणि नंतर..’ या विषयावर बोलताना भारतीय न्यायव्यवस्था आणि समाजकारण यावर भाष्य केले. एकविसाव्या शतकातही महिलांना समानतेची वागणूक मिळत नाही. देशात आजही स्त्रीयांपेक्षा गाईला जास्त सन्मान मिळतो, अशी खंत यावेळी वक्त्यांनी मांडली. तसेच त्यांनी महिलांना केवळ आई, ताई, पत्नी, सून अशा नात्यांमध्ये समजून घेण्यापेक्षा माणूस म्हणून समजून घ्यायला हवे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

‘स्वच्छ भारत : एक दिवास्वप्न’ या विषयावर बोलताना स्पर्धकांनी शहरातील कचराभूमीच्या विषयांवर भाष्य केले. मुंबई, ठाणे आणि उपनगरातील कचराभूमींच्या मर्यादा संपल्या आहेत. त्यामुळे कचराभूमीत कचऱ्याचे ढीग वाढत असून या कचऱ्याची दुर्गंधी शहरामध्ये पसरत असल्याचे वक्त्यांनी यावेळी सांगितले. असे असले तरी देशात सध्या सुरु असलेले स्वच्छता अभियान हे सकारात्मक पाऊल असल्याचेही वक्त्यांनी यावेळी आधोरेखित केले.

काही वर्षांपूवी देशात वाघाच्या ८ ते १० प्रजाती आढळत होत्या. मात्र, वाढत्या शहरीकरणामुळे जंगल नष्ट होत असून आता देशात वाघाच्या केवळ ३ प्रजाती आढळतात, असे सांगत वक्त्यांनी पर्यावरणाच्या ऱ्हासाविषयी खंत व्यक्त केली. देशात केवळ  क्रिकेट या खेळाला महत्व दिले जात असल्याने देशातून खेळ संस्कृती हद्दपार होत चालली आहे. क्रिकेट शिवाय इतर खेळातील खेळाडूंना पुरेशा सुविधा मिळत नसल्याने ऑलिंम्पिक खेळात देशाला फार कमी पदके मिळतात, असे मत वक्त्यांनी मांडले.

या स्पर्धेचे परिक्षण लेखक  अरविंद दोडे आणि आनंद विश्व गुरुकुल विधी महाविद्यालयाचे प्राचार्य अ‍ॅड. सुयश प्रधान यांनी केले. भाषणातील दोन वाक्यांमध्ये अंतर ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे वक्त्यांच्या वाक्यांवर परिक्षक आणि प्रेक्षकांना विचार करायला वेळ मिळतो, असा सल्ला लेखक  अरविंद दोडे यांनी वक्त्यांना दिला. विषयाची निवड केल्यानंतर त्यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. पुरेशा प्रमाणात अभ्यास केल्यास विषयाची मांडणी उत्तम करता येते, असे मार्गदर्शन अ‍ॅड. सुयश प्रधान यांनी केले.

विभागीय अंतिम फेरीत दाखल झालेल्या वक्त्यांची नावे:- प्रथमेश अनिल उंबरे, ग्रेसी नितिन देव, आर्या मोहन सबनीस, अनिकेत सुभाष पाळसे, चांदणी संजय गावडे, यश रविंद्र पाटील

ठाणे विभागीय अंतिम फेरी

कधी? शुक्रवार, ६ मार्च, वेळ – सायंकाळी ६ वाजता

कुठे? सहयोग मंदीर, घंटाळी, नौपाडा, ठाणे (प.)

प्रायोजक..

‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ ही स्पर्धा मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, रत्नागिरी, नागपूर, कोल्हापूर अशा आठ कें द्रांवर होणार आहे. ही स्पर्धा पॉवर्ड बाय ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’ असून या स्पर्धेचे बँकिंग पार्टनर ‘डोंबिवली नागरी सहकारी बँक’ हे आहेत. नॉलेज पार्टनर चेतनाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च हे आहेत.

पुणे, नागपुरात आज प्राथमिक फेरी

पुणे/नागपूर : तरुणाईला विचारप्रवृत्त करत सभोवतालच्या घटनांवर व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ देणाऱ्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेची पुणे आणि नागपूर विभागीय फेरी आज, सोमवारी रंगणार आहे. या दोन्ही विभागांतील विद्याथ्र्र्यानी मोठय़ा संख्येने या स्पध्रेत सहभाग नोंदवला असून, विभागीय अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.

सोमवारी पुण्यात विभागीय प्राथमिक फेरीला सुरुवात होईल. नागपूरची प्राथमिक  फे री सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस चालणार आहे. सोमवारी सकोळी ९.३० वाजता विनोबा विचार कें द्रात स्पर्धेला सुरु वात होईल.

त्यातून प्रथमेश अनिल उंबरे, ग्रेसी नितीन देव, आर्या मोहन सबनीस, अनिकेत सुभाष पाळसे, चांदणी संजय गावडे, यश रवींद्र पाटील या सहा वक्त्यांची विभागीय अंतिम फेरीत निवड झाली. ठाणे विभागीय अंतिम फेरी शुक्रवारी होणार आहे.