त्र्यंबकेश्वर येथील पहिने गावाच्या हद्दीतील नवरा नवरी हे दोनशे पन्नास फूटहून अधिक उंचीचे दोन सुळके कल्याण मधील सहा वर्षाच्या ग्रीहिता विचारे या मुलीने रॉक क्लाइंबिंग करत पार केले आहेत. नवरा नवरी सुळक्यावर अशा प्रकारचे साहस करणारी ग्रीहिता ही पहिलीच मुलगी आहे. तिच्या या साहसाला कल्याणच्या सह्याद्री रॉक एडवेंचर संस्थेचे मोलाचे सहकार्य मिळाले.

हे साहस करताना तिने भारतीय पारंपरिक वेशातील नऊवारी साडी नेसली होती. नवरी सुळका २८० फूट उंच, नवरा सुळका २६० फूट उंच आहे. या सुळक्यांच्या बाजूला हनुमानाच्या जन्माचे अंजनेरी गाव आहे. याशिवाय इतर लहान-मोठे गड़, किल्ले येथे आहेत. पायथ्यापासून सुळक्यावर जाण्यासाठी निबिड जंगल, दगड धोंडे असा अडथळयाचा मार्ग आहे. ग्रीहिता हिने लक्ष्मणपाडा इथून सोमवारी सकाळी सहा वाजता सुळक्यावर चढण्यास सुरुवात केली. एक तासात तिने ही मोहीम फत्ते केली. तिच्यासोबत चढाईसाठी आवश्यक सामग्री देण्यात आली होती. प्रस्तरोहणासाठी तिच्याजवळ हेल्मेट, हरणेस, झुमर इतर आवश्यक साधने दिली होती. नवरी सुळक्यावरून तिने यशस्वीपणे रॉक क्लाइंबिंग करत नवरा-नवरी सुळक्यामधील दोन हजार फूट अंतर पार केले.

murder of girlfriend, mumbai,
मुंबई : प्रेयसीच्या हत्येप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीला अटक
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू
Theft of gas from cooking cylinders Two arrested for doing illegal business
स्वयंपाकाच्या सिलिंडरमधून गॅस चोरी; पत्र्याच्या खोलीत बेकायदा व्यवसाय करणारे दोघे अटकेत

नवरा नवरी सुळक्याच्या दरम्यान अशाप्रकारचे साहस करणारी ग्रीहिता ही पहिलीच मुलगी असल्याने तिचा पहीने गावच्या पोलीस पाटलांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सह्याद्री रॉक एडवेंचर संस्थेचे पवन घुगे दर्शन देशमुख रंजीत भोसले यांचे महत्वाचे सहकार्य आणि मार्गदर्शन ग्रिहिता विचारेला लाभले.