ठाणे : घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीच्या दृष्टीने गायमुख घाट अत्यंत महत्त्वाचा असून त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम वेगाने मार्गी लावावे, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. तसेच घोडबंदर भागातील रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आलेली बेवारस वाहने हटविण्यासाठी महापालिका, प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस यांनी एकत्रितपणे मोहीम हाती घ्यावी, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.

घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेसह विविध यंत्रणा, जस्टीस फॉर घोडबंदर रोड या संस्थेचे प्रतिनिधी या सर्वांची बैठक सप्टेंबर महिन्यात झाली होती. या बैठकीत विविध उपायांवर चर्चा करण्यात आली होती. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी गुरुवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाठ, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, उपायुक्त मनीष जोशी, मधुकर बोडके, शंकर पाटोळे, दिनेश तायडे, उपनगर अभियंता विकास ढोले आणि शुंभागी केसवानी, घोडबंदर रोडवर काम करणाऱ्या यंत्रणांचे समन्वयक आणि कार्यकारी अभियंता संजय कदम, वृक्ष अधिकारी केदार पाटील, जस्टिस फॉर घोडबंदर रोडचे प्रतिनिधी, मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Dombivli illegal hoardings loksatta news
डोंबिवलीत बेकायदा फलक लावणाऱ्या आस्थापनांवर फौजदारी गुन्हे, पाच हजार फलकांवर कारवाई
Thane Traffic Branch, Thane Police ,
ठाणे वाहतूक शाखेच्या विभाजनाचा प्रस्ताव, वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी ठाणे पोलिसांची निर्णय
Tax revenue is vital for civic services and property tax ensures
करभरणा प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्रयत्न गरजेचे, महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची सूचना
Meter inspector suspended in bribery case
पिंपरी : लाच प्रकरणातील मीटर निरीक्षक निलंबित
Traffic rules Vietnam, Traffic rules reward ,
विश्लेषण : वाहतूक नियम मोडणारे दाखवा नि बक्षीस मिळवा… व्हिएतनाममधील अनोख्या उपायाची भारतातही नेटकऱ्यांमध्ये काय चर्चा?
Supreme Court order regarding the dispute over a private well near the entrance of Sambhal Jama Masjid
संभलमधील स्थिती ‘जैसे थे’, न्यायालयाचा आदेश; विहिरीबाबत कार्यवाही करण्यास मज्जाव

हेही वाचा – कल्याण डोंबिवली पालिकेची नागरी सुविधा केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरू

गायमुख घाट रस्ता येथील रस्त्याच्या दुरुस्तीविषयी अजूनही तक्रारी आहेत. संपूर्ण रस्त्याचे योग्य पद्धतीने डांबरीकरण करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली. दुचाकी वाहनांसाठी हा घाट मार्ग अजूनही धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासंदर्भात, भविष्यात कॉंक्रिटीकरण होणार आहे म्हणून आता रस्ता किरकोळ दुरुस्ती करून तसाच ठेवता येणार नाही. त्यामुळे तो सर्व वाहनांसाठी योग्य राहील अशी गुणवत्तापूर्ण दुरुस्ती करावी, अशा सूचना आयुक्त राव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रतिनिधींना केल्या. घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीच्या दृष्टीने गायमुख घाट अत्यंत महत्त्वाचा असून त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम वेगाने मार्गी लावावे, असे निर्देशही त्यांनी दिले. घाटातील कामासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक असून ती डिसेंबर अखेरपर्यंत मिळाल्यास पुढील चार महिन्यात घाट रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने देण्यात आली.

वाहतूक पोलिसांच्या सहाय्यासाठी नेमण्यात आलेले वाहतूक सेवक आणि बसचालक यांचे सध्या रस्ता सुरक्षेबाबत प्रशिक्षण सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी सांगितले. आवश्यकता असल्यास आणखी कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. या वाहतूक सेवकांना काही ठिकाणी त्रास दिला जातो, वाहनचालक त्यांचे ऐकत नाहीत, अशी निरीक्षणे नागरिकांच्या वतीने मांडण्यात आली. आनंद नगर सिग्नल येथे एकूण ११ ठिकाणी रस्ते ओलांडले जातात. त्यामुळे सिग्नल असूनही वाहतूक संचलन नीट होत नाही. त्याकरीता सिग्नलची जागा बदलावी अशी सूचना नागरिकांच्या वतीने करण्यात आली. त्यासंदर्भात, पालिकेचा विद्युत विभाग आणि वाहतूक पोलीस यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून तोडगा काढावा, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले.

हेही वाचा – मतदान बंद झाल्यानंतर मतटक्केवारीत वाढ होते कशी? जितेंद्र आव्हाड यांचा प्रश्न

कापूरबावडी आणि कॅडबरी उड्डाणपूलाच्या दुरुस्तीचे काम रेंगाळले असल्याची तक्रार नागरिकांनी केली. त्यावर, कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये त्यावर बोलणी सुरू असून तेही काम लवकरच पूर्ण होईल, असे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. घोडबंदर रोडवरील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग, मेट्रो आदी यंत्रणा दक्ष आहेत. त्यांच्याकडून वेळोवेळी सहकार्य मिळत असल्याने बऱ्याच समस्या दूर झाल्या आहेत. चांगल्या समन्वयामुळे हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया बैठकीच्या सुरुवातीला जस्टीस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.

अवजड वाहतुकीसाठी उपाययोजना

स्थानिक अवजड वाहने, मुंबईकडून येणारी अवजड वाहने यांची वर्दळ बंदीच्या काळातही सुरू असते. तसेच, बाहेरील वाहने रोखून ठेवण्यावरही मर्यादा येत असल्याने या अवजड वाहनांबाबत कोणती व्यवस्था करायची यावर वाहतूक पोलीस विचार करत असल्याची माहिती उपायुक्त शिरसाठ यांनी दिली.

Story img Loader