कल्याण : कल्याणमधून भिवंडीच्या दिशेने जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या विठाई बस चालकाला दुचाकीवरील दोनजणांनी पुढे जाण्यासाठी जागा का देत नाही, या कारणावरून लालचौकी बस थांब्यावर सोमवारी बेदम मारहाण केली. लोखंडी सळई, हेल्मेट चालकाच्या डोक्यात मारल्याने चालकाला गंभीर जखमा झाल्या आहेत. महेंद्र पांडुरंग पाटील (३९, रा. ऐरोली, नवी मुंबई), शंकर पाटील (३५) अशी आरोपींची नावे आहेत. विठ्ठल जगन्नाथ दराडे (४२, भिवंडी) असे जखमी झालेल्या एस. टी. बस चालकाचे नाव आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

विठ्ठल दराडे आपल्या ताब्यातील प्रवाशांनी भरलेली विठाई बस घेऊन सोमवारी दुपारी कल्याण आगारातून भिवंडीच्या दिशेने चालले होते. या बसच्या पाठीमागे आरोपी महेंद्र, शंकर हे दुचाकीवरून चालले होते. लालचौकी येथे प्रवासी उतरण्यासाठी चालक विठ्ठल यांनी बस रस्त्याच्या बाजुला घेतली. त्यावेळी बसच्या पाठीमागून येत असलेल्या आरोपींनी दुचाकी बसच्या पुढे उभे करून चालक विठ्ठल यांना बस कशी चालवायची, कुठे उभी करायची हे तुला कळते का, असे प्रश्न करून शिवीगाळ करून त्यांना लोखंडी सळई, हेल्मेटच्या साहाय्याने बेदम मारहाण केली. ‘तू बस घेऊन भिवंडीत कसा येतो, ते आम्ही बघतो’ अशी धमकी देऊन दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला. सरकारी कामात अडथळा म्हणून चालक विठ्ठल यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी मारेकऱ्यांचा तपास सुरू केला आहे.

old man hit by bike rider, Kamothe,
कामोठेत वृद्धाला दुचाकीस्वाराने उडवले
thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
thane traffic
कल्याण: पत्रीपुलावर दोन तासांपासून वाहनांच्या रांगा
Passengers Spider-Man stunt to reach train toilet goes viral
गर्दीने खचाखच भरली होती रेल्वे, टॉयलेटमध्ये जाण्यासाठी प्रवासी झाला स्पायडर मॅन! व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आवरेना हसू

हेही वाचा – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांवर आक्रमक कारवाई; रस्ते, पदपथ मोकळे

हेही वाचा – कल्याणमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू

तिकीट तपाणीसाला धमकी

कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक चार ते सहावरील प्रवाशांकडील तिकिटाची तपासणी करत असताना रविवारी दुपारी उत्तर प्रदेशातून विना तिकीट प्रवास करून आलेल्या चार तरुण प्रवाशांनी मुख्य तिकीट तपासणीस दिवाकांत भास्कर, विजय मंडळ यांना शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. शिवकुमार जैसवाल, सुंदरी शिवकुमार जैसवाल, आनंद आणि मेवालाल अशी आरोपी प्रवाशांची नावे आहेत. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तिकीट तपासणीस दिवाकांत भास्कर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिकीट तपासणीस रविवारी दुपारी कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक सहावर तिकीट तपासणी करत असताना त्यांना आरोपी प्रवाशांकडे तिकीट नसल्याचे आढळले. त्यांना तिकीट तपासणी कार्यालयात आणण्यात आले. तेथे आरोपींनी संघटितपणे दोन्ही तिकीट तपासणीसांना शिवागीळ, मारण्याची धमकी देऊन पळ काढला.