ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील रुग्णांना मोफत दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने ९०० खाटांचे सुपरस्पेशलिटी रुग्णालय उभारणीत येणार असून या कामाच्या निविदा प्रक्रियेस होत असलेल्या विलंबाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत येत्या पंधरा दिवसांत निविदा प्रक्रिया उरकून प्रत्यक्षात काम सुरूवात करण्याचे आदेश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागेवर ९०० खाटाचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असून या रुग्णालयाची रुग्णालयाची क्षमता तिप्पट होणार आहे. तसेच, न्यूरॉलॉजी, आँकॉलॉजी व आँको सर्जरी सेक्शन, कार्डिओलॉजी व कार्डिओ व्हॅस्क्युलर सेक्शन आणि नेफ्रॉलॉजी व डायलिसिस सेक्शन यांसारख्या अत्याधुनिक उपचार सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार असल्यामुळे कर्करोग, हृदरोग, मेंदूशी संबंधित आजार, श्वसनाशी संबंधित विकार या आजारांवरही उपचार करता येणे शक्य होणार या प्रस्तावानुसार रुग्णालय, परिचारिका प्रशिक्षण केंद्र आणि वसतीगृह इमारतीच्या बांधकामासाठी राज्य शासनाने ५२७ कोटी ४१ लाखांचा निधी मंजुर केला आहे.

यामुळे रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला असला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाची निविदा अद्याप काढलेली नाही. याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाणे जिल्ह्यधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केली. निविदा काढण्यास इतका विलंब का होत आहे असा जाबही त्यांनी विचारला. विद्युत विभागाच्या तांत्रिक अडचणींमुळे निविदा प्रक्रियेस विलंब होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यावर येत्या पंधरा दिवसात सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करत निविदा प्रक्रिया उरकून प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्याचे आदेश त्यांनी दिले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Start work of thane district superspeciality hospital fortnight cm eknath shinde amy
First published on: 06-07-2022 at 18:27 IST