अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान उभारणीच्या प्रतिक्षेत असलेल्या चिखलोली स्थानक आणि तिसऱ्या चौथ्या मार्गिकेच्या कामासाठी लागणारा राज्य सरकारचा ५० टक्के वाटा अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांचे काम रखडण्याची भीती व्यक्त होते आहे. आवश्यक जागेची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी त्याचा मोबदला अद्याप देण्यात आलेला नाही. जमीन मालकांना आता व्याजही द्यावे लागणार आहे. परिणामी प्रकल्पाचा खर्च वाढण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांचा विस्तार चारही बाजूंना झाला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी अंबरनाथ आणि बदलापूर शहरांच्या सिमेवर चिखलोली भागात नव्या स्थानकाची अनेक वर्षांची मागणी होती. स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी याचा अनेक वर्ष पाठपुरावा केल्याने तीन वर्षांपूर्वी स्थानकाला मंजुरी मिळाली. पुढे अनेक प्रक्रिया होत काही महिन्यापूर्वी यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली. तर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमातून तिसऱ्या चौथ्या रेल्वे मार्गासाठीही याच काळात भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी रेल्वेने भूसंपादन कायदा २०ई नियमाखाली १५ डिसेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. तर २७ जानेवारी २०२२ रोजी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर इतर हक्कात दिनांक भूसंपादनात समाविष्ट असा शेराही मारण्यात आला आहे. मात्र या भूसंपादीत जमिनीचा मोबदला अजूनही जमिन मालकांना देण्यात आलेला नाही. त्यामुळे जमिन मालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State share for chikhloli station pending amy
First published on: 20-07-2022 at 13:44 IST